Nag Panchami Lucky Zodiac Signs: श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑगस्टच्या सुरुवातीलाच येणारी नागपंचमीची तिथी पुढे ढकलली गेली . हिंदू पंचांगानुसार यंदा २१ ऑगस्टला नागपंचमी साजरी होणार आहे. विशेष म्हणजे यंदा नागपंचमी ही सोमवारच्या शुभ मुहूर्तावर जुळून आली आहे. धार्मिक मान्यतांनुसार सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो, श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच. नागला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळखही मानली जाते. असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. याचा प्रभाव शिवभक्तांवर दिसून येऊ शकतो. त्यातही ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार काही असा राशी आहेत ज्यांच्यावर नागपंचमीला भोलेनाथांची खास कृपा असणार आहे.
नागपंचमीला ‘या’ राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
नागपंचमीपासून मेष राशीच्या नशिबातील अच्छे दिन सुरु होणार आहेत. या मंडळींना येत्या काळात प्रचंड मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायट गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. आर्थिक प्रगतीसह समाजातील स्थान सुद्धा आणखी भक्कम होऊ शकते.
धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)
धनु राशीच्या मंडळींसाठी नागपंचमीच नव्हे तर संपूर्ण श्रावण महिना खास असणार आहे. या मंडळींना आयुष्यातील मोठ्या अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी या काळात प्राप्त होईल. वैवाहिक आयुष्यात हवाहवासा गोडवा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी ज्यांच्याशी आपले अजिबात मत जुळत नाही अशा लोकांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)
नागपंचमीच्या दिवशी वृश्चिक राशीला आपल्या आयुष्यातील कटूत्व दूर करण्याची संधी मिळू शकते. धनलाभ होण्यासाठी तुमच्या पती-पत्नी/ प्रियकर- प्रेयसी थोडक्यात अत्यंत जवळच्या प्रेमाच्या माणसाची खूप मोलाची साथ मिळेल. आयुष्याला कलाटणी देणारा बदल महादेव आपल्या जीवनात आणू शकतात.
हे ही वाचा<< ‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो, चूक की बरोबर? श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेलं उत्तर वाचा
कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)
कुंभ राशीला महादेवांची विशेष कृपा लाभण्याचं मुख्य कारण म्हणजे या राशीत शनिदेवाचा केंद्र त्रिकोण राजयोग तयार झालेला आहे. नागपंचमीचा दिवस व पुढील महिन्याभराच्या कालावधीत या राशीचे नशीब जोरावर असू शकते. शुभ कामाची सुरुवात होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)