ketu Nakshatra Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रात इतर ग्रहांप्रमाणेच राहू-केतू या दोन्ही ग्रहांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. केतू एक असा ग्रह आहे, जो कुंडलीत शुभ असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. पण, जर केतू अशुभ असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या केतू चंद्राच्या हस्त नक्षत्रामध्ये उपस्थित आहे, ज्याने ८ जुलै रोजी हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला होता. या नक्षत्रामध्ये केतू ८ सप्टेंबरपर्यंत राहील; ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.
केतूचे नक्षत्र परिवर्तन तीन राशींसाठी खास (ketu Nakshatra Parivartan)
मेष (Aries)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. मानसन्मानात वाढ होईल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. समाजात मानसन्मान मिळेल.
वृषभ (Taurus)
केतूचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारी ठरेल. या काळात तुमच्या सर्व लहान-मोठ्या इच्छा पूर्ण होतील. या काळात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या नक्षत्र परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
हेही वाचा: मंगळ करणार मालामाल; मंगळाच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
मकर (Capricorn)
मकर राशीच्या व्यक्तींसाठीदेखील केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्यात आत्मविश्वास, साहस निर्माण होईल. या काळात तुम्हाला आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)