Name Astrology: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नावाचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व सांगत असतात. व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या चारित्र्याच्या अनेक गुणांचे वर्णन करते. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण त्याचे भविष्य, त्याचा स्वभाव आणि करिअर यासंबंधी अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला A पासून Z पर्यंत अक्षरापासून नाव सुरु होत असलेल्या नावाचे लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, याविषयी सांगणार आहोत. 

नावाच्या पहिल्याच अक्षरात दडलाय तुमचा स्वभाव

A – ज्योतिषशास्त्रानुसार, A अक्षरापासून नाव सुरु होणारी लोकं खूप आत्मविश्वासू आणि धैर्यवान असतात आणि ते कोणावर अवलंबून राहत नाही. असे म्हणतात की, या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. ते नेहमी आनंदी असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

Surya and Chandra make Vaidhriti Yog
सूर्य-चंद्र बनवणार अशुभ योग, ‘या’ चार राशीच्या लोकांना घ्यावी काळजी, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
lord Ganesha favourite rashi
नवीन वर्षात ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस, गणपतीच्या कृपेने मिळणार अपार पैसा-संपत्ती
People get money and wealth after the age of 35 years
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा
zodiac signs get money and wealth by the shiva grace
शिवच्या कृपेने मिळणार ‘या’ तीन राशींच्या लोकांना पैसाच पैसा! २०२५ मध्ये चमकणार यांचे नशीब
laxmi narayan yog
तब्बल १२ वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Surya gochar 2024
सूर्य गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, वर्षाच्या शेवटी मिळणार अचानक पैसा अन् धन
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन

B- ज्योतिषशास्त्रानुसार, B अक्षरापासून नाव सुरु होणारे व्यक्ती अतिशय संवेदनशील स्वभावाचे असतात. ते कोणातही सहज मिसळत नाहीत. थोडे लाजाळू स्वभावाचे असतात.

C- ज्या लोकांचे नाव C अक्षराने सुरू होते. हे लोकं स्वभावाने खूप भावूक असतात. हे लोकं सामाजिक कार्यात रस घेतात आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो, ते मिलनसार असतात, ज्यामुळे ते सहजपणे कुठेही मित्र बनवतात. या लोकांना अतिशय पद्धतशीरपणे जगणे आवडते.

(हे ही वाचा : Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं असतात फार रागीट? पण कमी वयात होतात गडगंज श्रीमंत! )

D- D या अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोकं अतिशय मेहनती आणि उदार मनाचे असतात. हे लोकं अनेक गोष्टी मनात ठेवतात. त्यांना समजून घेणे खूप अवघड असते.

E- अक्षरापासून नाव सुरु होणारे फटकळ स्वभावाचे असतात. पण, यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत. 

F- अक्षरापासून नाव सुरु होणारे लोकं आपल्या कामाप्रती नेहमी प्रमाणिक असतात. गर्दीतही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. श्रीमंत होण्यासाठी कठोर मेहनत करतात आणि यशस्वीही होतात.

G- अक्षरापासून नाव सुरु होणारे लोकं स्वभावाने साधे, सौम्य, आकर्षक आणि हुशार असतात. प्रेमाच्या बाबतीत या अक्षराचे लोकं प्रामाणिक आणि शुद्ध विचाराचे असतात. हे लोकं भावनिक असल्याने काहीवेळा त्यांना नुकसानही सहन करावे लागते. 

H- अक्षरापासून नाव सुरु होणारे लोकं खूप संकोची आणि संवेदनशील असतात. या व्यक्ती स्वत:च्या गोष्टी कोणाला सांगत नाहीत. दुख:ही सांगत नाहीत. या व्यक्ती रहस्यमयी असतात.

I- ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील I अक्षराने सुरू होते, ते संवेदनशील स्वभावाचे असतात. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे ते भावूक होतात. ते आपले प्रत्येक काम मनापासून करतात आणि दृढ हेतूने पूर्ण करतात. 

J- नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते, ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. या नावाचे लोकं खूप कोमल स्वभावाचे असतात. पैशाच्या बाबतीत लकी असतात.

(हे ही वाचा : जन्मापासूनच कन्यासह ‘या’ ३ राशींच्या मुली वडिलांसाठी भाग्यशाली सिद्ध होतात? लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येते दारी? )

K- ज्या लोकांचे नाव K अक्षराने सुरू होते ते स्वभावाने आळशी आणि हट्टी मानले जातात. हे लोकं त्यांचे जीवन त्यांच्या अटींवर जगतात परंतु ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असतो.

L- अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते अशा व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतात. या व्यक्तींना जास्त राग येत नाही. या व्यक्तींचा स्वभाव गोड असतो. सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. 

M- या लोकांचा स्वभाव थोडा जिद्दी, हट्टी असतो. अशा स्वभावामुळे ते कधीकधी अडचणीत येत असतात.

N- अक्षरापासून नाव असणारे लोकं बिनधास्त असतात. बोलायला ते खूप मोकळे असतात. ते खूप जिद्दी आणि कष्टाळू असतात.

O- अक्षरापासून नाव असणारे लोकं खुल्या विचाराचे असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन जायला त्यांना आवडते.

P- अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिक असतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कोणत्याही गोष्टीत सहजासहजी हार मानत नाहीत.

Q- अक्षरापासून नाव असणारे लोकं असलेले स्वभावाने खरे आणि प्रामाणिक असतात. हिंमत कधीही हरत नाहीत मात्र गरज पडेल ते असेही काम करतात ज्यांची यांच्याकडून अपेक्षा नसते.

R- ज्या लोकांचे नाव R अक्षराने सुरु होते त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. ते काही बाबतीत खूप भावनिक असतात, त्यांना खूप लवकर रागही येतो.

S- अक्षरापासून नाव असणारे लोकांच्या मेहनती वृत्तीमुळे कोणत्याही क्षेत्रात ते मेहनत करू शकतात. ते आपल्या करिअरसाठी खूप घेतात आणि यामुळेच त्यांना यश मिळते. 

(हे ही वाचा : २०२४ मध्ये ‘या’ ४ राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल? शनिदेव-केतूच्या संयोगाने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा )

T- अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना लग्झरी लाइफ जगायला खूप आवडते आणि त्यांना महागड्या गोष्टींचे खूप आकर्षण असते.

U- अक्षरापासून नाव असणारे लोकं खूप हुशार असतात. ते कधीच मागे वळून पाहत नाहीत. ते नेहमी स्वतःच्या आनंदापूर्वी इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. नाते संबध ते योग्य प्रकारे जपतात.

V- अक्षरापासून नाव असणारे लोकं प्रेमळ आणि प्रामाणिक असतात. ते त्यांच्या आयुष्यात कुटूंबाला आणि त्यांच्या कामाला खूप जास्त महत्त्त देतात.

W- हे लोक दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असतात. ह्या व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात. त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात. पैशाच्या बाबतीत यश मिळवतात.

X- या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोकं प्रेमळ स्वभावाचे असतात. यामुळे ते आपल्या लाइफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात. आनंदी राहणं, आपलं जीवन आनंदाने जगणं हा या लोकांचा स्वभाव असतो. 

Y- अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या लोकांचा स्वभाव सरळ असतो. तसेच त्यांना शांत राहायला आवडते. कठीण प्रसंगांचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात.

Z- या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोकं इतरांशी फार लवकर मिसळतात. त्यांना जीवनाचा खूप आनंद घ्यायला आवडतो. आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात. 

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)

Story img Loader