जर तुम्ही चांगला जीवनसाथी शोधत असाल, तर नाव ज्योतिष शास्त्र यामध्ये खूप मदत करू शकते. नाव ज्योतिष शास्त्राच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की मुलगा किंवा मुलगी एक चांगला जीवनसाथी आहे की नाही. तो मुलगा किंवा मुलगी यांच्याबद्दल नावाच्या पहिल्या अक्षरावरून ओळखता येते. वास्तविक, नाव ज्योतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया की कोणत्या अक्षराने नाव सुरू होणारे लोक चांगले जीवनसाथी बनतात. तसेच कोणत्या लोकांसोबत यांचे जास्त जमते.
A अक्षराने सुरू होणारी नावे:
A अक्षराने नाव सुरु होणारे लोक अतिशय चांगल्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात. यश मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात, तसेच आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. ज्यांचे नाव P किंवा K ने सुरू होते अशा लोकांशी त्यांचे लग्न झाले असेल तर त्यांचे आयुष्य खूप छान जाते.
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
ज्या लोकांची नावे D ने सुरू होतात:
ज्यांचे नाव D अक्षराने सुरू होते ते लोक खूप मनमिळाऊ असतात. या लोकांना नेहमी नवीन मित्र बनवायला आवडतात आणि त्यांनी ज्या व्यक्तीशी लग्न केले त्याची खूप काळजी घेतात. हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप प्रामाणिक असतात आणि लग्नानंतर खूप आर्थिक प्रगती करतात. या लोकांच्या विवाहासाठी K आणि S नावाचे लोक उत्तम असतात.
ज्या लोकांचे नाव H ने सुरू होते:
जर नावाची सुरुवात H अक्षराने होत असेल तर असे लोक नेहमी आपल्या जोडीदाराला प्राधान्य देतात. हे लोक खूप रोमँटिक नसले तरी जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्याच्यासाठी सर्व सुख-सुविधा गोळा करण्यासाठी भरपूर वेळ देतात. त्या बदल्यात त्यांचा पार्टनरही त्यांच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करतो. जर या लोकांचा विवाह अशा मुलाशी किंवा मुलीशी झाला ज्याचे नाव M आणि L ने सुरू होते, तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)