-उदयराज साने

Astrology Predictions For Political Parties: दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सध्या अनेक राज्यांच्या दौऱ्यावर असून विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार अशीही त्यांची जाहिरातबाजी सुरू आहे. पलीकडे केरळमध्ये कम्युनिस्टांना भाजपाने आव्हान दिले आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. मात्र दक्षिणेच्या राज्यांतील हे सर्व प्रादेशिक पक्ष आता थोडेसे कमकुवत झालेले दिसतात. आणि पलीकडच्या बाजूस ग्रहबळ मात्र भाजपाच्या पारड्यात वजन टाकताना दिसते आहे. एकुणात आजवर कधीही शक्य न झालेला दक्षिणेच्या राज्यांतील चंचुप्रवेश या खेपेस मात्र भाजपाला शक्य होईल असे ग्रहस्थिती सांगते आहे.

१) आंध्र प्रदेश

दक्षिण भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून आंध्र प्रदेशची ओळख आहे. लोकसभेच्या ४२ जागा या राज्यात येतात. या राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे तेलगू देशम पार्टी. १९८२ पासून हा पक्ष अग्रेसर आहे. या पक्षाच्या कुंडलीतील भाग्यस्थानातून कुंभेच्या शनीचे भ्रमण होत असून, मीन राशितील राहूचे भ्रमण दशम स्थानातून होणार आहे. तर प्लुटोचे भ्रमण मकर राशीतून होत आहे. यातील दोन ग्रहांची भ्रमणे पक्षासाठी संपूर्ण चांगली असून, फक्त राहूचे भ्रमण ह्या पक्षासाठी चांगले नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुका पक्षाला अडचणीच्या जाणार असून त्यावेळी त्यांचा संघर्ष आणखी वाढीस लागणार आहे असे दिसून येते.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लान आखला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लान आखला?
Five Political Trends in 2025
भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष

२) तेलंगण


२ जून २०१४ ला तेलंगण हे २९ वे राज्य अस्तित्वात आले. याचे मुख्यमंत्री चंद्र शेखर राव यांनी टीआरएस या पक्षाची स्थापना करून स्वतःचे भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. लोकसभेच्या १७ जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहेत. या पक्षाच्या कुंडलीत कुंभेतील शनी भ्रमण, हे पक्षाच्या मूळ कुंडलीतील रवीच्या केंद्रातून होणार आहे. मकर राशीतील प्लुटो, हा चंद्राच्या सप्तमातून भ्रमण करत राहणार आहे. मीन राशीतील राहू भ्रमण अष्टमातून व मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकातून होत असल्याने, २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता दिसून येते. गेल्या वेळी जे यश पक्षाला मिळाले ते टिकवण्याचेच आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. याबरोबरच पक्ष विस्ताराची योजना त्यांना सोडावी
लागणार आहे.

३) कर्नाटक

दक्षिण भारतातील आणखी एक महत्त्वाचे राज्य म्हणजे कर्नाटक. लोकसभेच्या २८ जागा या राज्यात आहेत. भाजपाने हे राज्य काँग्रेस व जनता पक्षाकडून हिसकावून घेतले. पण अंतर्गत दुफळीमुळे या राज्याला पुन्हा अस्थिरता वाट्याला येते का, हेच आता पहावयाचे आहे. २०२४ च्या लोकसभेसाठी जनता पक्षाला ग्रहमान बघता कुंभेचा शनि हा मूळ कुंडलीतील रवि चंद्राच्या षडाष्टकात राहणार आहे. मीनेचा राहू हा रविचंद्राच्या समोर राहणार असून या राहूचे भ्रमण मंगळावरून होणार आहे. मकर राशीतील प्लुटो हा मूळ कुंडलीतील चंद्राच्या पंचमातून जाणार आहे. या सर्व महत्त्वाच्या ग्रह स्थितीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महत्त्वाचे प्रमुख ग्रह चांगलेच बिघडलेले असल्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत जनता पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

४) तामिळनाडू

तामिळनाडू हे दक्षिणेतील आणखी एक महत्त्वाचे राज्य असले तरी, प्रत्येक वेळी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोनच पक्ष आलटून पालटून निवडून येत आहेत. या राज्यात लोकसभेसाठी ३९ जागा असून आपण त्यांच्या पत्रिका बघणार आहोत. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या पत्रिकेत या पक्षाला सध्या साडेसाती सुरू असून कुंभ राशीतील शनी भ्रमण त्यांना अनुकूल आहे, मात्र मीन राशीतून होणारे राहुचे भ्रमण त्यांच्या चतुर्थातून होणार असून हा राहू पक्षाला प्रतिकूल आहे.

मकर राशीतील प्लूटोचे भ्रमण मूळ कुंडलीतील चंद्रावरून सुरू असून ते पक्षाला प्रतिकूल आहे म्हणूनच यावेळी म्हणजे २०२४ च्या निवडणुकीत लोकसभेसाठी या पक्षाला अनेक ठिकाणी मोठासंघर्ष करावा लागणार आहे. तामिळनाडूतील दुसरा बलवान प्रादेशिक पक्ष म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम. या पक्षाच्या कुंडलीत कुंभेतील शनीचे भ्रमण पक्षाच्या कुंडलित चतुर्थातून सुरू आहे, हे त्यांच्या पक्षासाठी उपयुक्त आहे. तथापि, मीन राशीतून होणारे राहूचे भ्रमण हे राहू वरून होणार असून मूळ कुंडलीतील बुध मंगळाच्या प्रतियोगात राहणार असल्याने, पक्षात मोठी फूट पडणार आहे. यासाठी मकर राशीतील. प्लुटो त्या फुटीला मदत करणार असून, २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला कमालीचा संघर्ष करावा लागणार आहे. तामिळनाडूमध्ये दोन पक्षच सतत क्रमाक्रमाने सत्तेच्या रिंगणात राहणार असले तरी यावेळी प्रथमच हे दोन्ही पक्ष थोडे कमकुवत झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यात चंचू प्रवेश करणं सहज शक्य होणार आहे.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी

५) केरळ

दक्षिण भारतातील शेवटचे राज्य म्हणजे केरळ. या राज्यात लोकसभेच्या २० जागा असून काँग्रेस व कम्युनिस्ट हे दोन पक्ष वर्षानुवर्ष येत आहेत. त्यातील सीपीआय हा कम्युनिस्ट पक्ष अग्रेसर असून, कुंभ राशीतील शनी भ्रमण हे या पक्षाला अनुकूल असले, तरी मीन राशीतील राहू हा पक्षाच्या मूळ कुंडलीतील, रवीच्या केंद्रात राहणार असल्याने, पारंपारिक मतदार येत्या २०२४ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षापासून थोडा लांबच राहणार आहे. मकर राशीतून होणारे प्लुटोचे भ्रमण कुंडलीतील चंद्राला दहावे असून, गुरु शुक्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांवरून होणार असल्याने, स्त्रिया व सुशिक्षित समाज हा सुद्धा पक्षापासून थोडा लांबच राहणार आहे. याचाच सम्यक परिणाम म्हणून२०२४ च्या निवडणुकीत या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावं लागण्याची शक्यता दिसून येत आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांचा विचार करता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक राज्यात चंचू प्रवेश करणे सहज शक्य होणार आहे.

Story img Loader