Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह अतिशय शक्तिशाली ग्रह मानला जातो. हा ग्रह ४५ दिवसांनी राशिबदल करतो; ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो. यात मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी मंगळ आणि नेपच्युन हे ग्रह नवपंचम राजयोग निर्माण करीत आहेत. १३ जानेवारी रोजी पहाटे २ वाजून ३७ मिनिटांनी मंगळ व नेपच्युन एकमेकांपासून १२० अंशावर असतील आणि त्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल. त्यांना नोकरी-व्यवसायात भरभरून यश मिळू शकते. आर्थिक आणि भौतिक सुखाचा अनुभव मिळू शकतो. नवपंचम राजयोगामुळे नेमक्या कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रात नेपच्युनला वरुण ग्रह, असे म्हणतात. जो खूप हळू भ्रमण करतो, ज्याचा केतू ग्रहाप्रमाणेच १२ राशींच्या जीवनावर प्रभाव पडतो. जर हा ग्रह तुमच्या कुंडलीत शुभ स्थितीत असेल, तर तुमचे भाग्य बदलू शकते. हा ग्रह सुमारे १४ वर्षे एकाच राशीत राहतो. यावेळी नेपच्युन ग्रह मीन राशीत विराजमान आहे.

नवपंचम राजयोगाने या राशींवर होईल पैशांचा पाऊस! मिळेल सुख अन् समाधान (Navpancham Rajyog 2025)

v

कर्क

मंगळ आणि वरुण ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकेल. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. यासह तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होऊ शकता. समाजात आदर वाढणार आहे. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करीत असाल, तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते.

कन्या

नवपंचम राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुमचे संवादकौशल्य चांगले असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. यासह तुम्ही पुरेसे पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेमी जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलू शकता.

तूळ

नवपंचम राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठीआनंद घेऊन येणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो; पण तुम्हाला यातून खूप फायदा होऊ शकतो. नोकरीतही अनेक नवीन संधी मिळू शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navpancham rajyog 2025 mangal and varun planet on 120 degree make navpancham yog on makar sankranti positive impact on these zodiac sign earn more money and happiness sjr