Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. कारण हा राशी परिवर्तनासाठी खूप वेळ घेतो. वर्तमान काळात शनि कुंभ राशीमध्ये स्थित आहे आणि होळीनंतर मंगळबरोबर नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार ५ एप्रिल सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शनि आणि मंगळ बरोबर १२० डिग्रीचे अंतर असणार ज्यामुळे शुभ योग निर्माण होणार. या राजयोगचा प्रभाव काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. काही राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊ या, हा राजयोग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग विशेष रुपाने फलदायी सिद्ध होणार आहे. या दरम्यान या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासून अडकलेल्या कार्यांना गती मिळेल आणि कामी मार्गी लागतील. लहान बहिण भावांबरोबर विचारांमध्ये मतभेद होऊ शकतो पण यामुळे लाभच होणार. आई वडिल आणि गुरूचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाचा नवपंचम राजयोग अत्याधिक शुभ ठरणार आहे. भौतिक सुध सुविधांमध्ये वृद्धी होणार आहे. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. बहिण भावाबरोबर मधुर संवाद निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. करिअरमध्ये प्रगती होईल ज्यामुळे पगार वाढ होऊ शकते आणि पदोन्नती होऊ शकते. कुटुबांचे सहकार्य लाभेन. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. जोडीदाराबरोबरच्या नात्यात गोडवा जाणवेल.

कन्या राशी

या राशीच्या लोकांसाठी जीवनात हा राजयोह आनंदाचे क्षण घेऊन येणारा असू शकतो. करिअरमध्ये विशेष प्रगती दिसून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. या लोकांच्या जबाबदार्‍या आणखी वाढतील. समाजात मान सन्मान मिळेल. व्यवसायात जबरदस्त फायदा होईल. प्रेम संबंध आणखी दृढ होईल. लव्ह लाइफ उत्तम राहीन. व्यवसायात गुंतवणूकीतून लाभ मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navpancham rajyog 2025 three zodiac signs get property and happiness like a king they will money and wealth ndj