Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर दिसून येतो. ग्रहाचे सेनापती मंगळ जवळपास ५६ दिवसानंतर राशी परिवर्तन करणार आहे ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा पुन्हा दृष्टी पडणार आहे. या वेळी मंगळ मिथुन राशीमध्ये विराजमान होणार आहे. तर मंगळ बुध बरोबर नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे.
खरं तर २३ फेब्रुवारी रात्री १० वाजून २६ मिनिटावर बुध आणि मंगळ एक दुसऱ्यांवर १२० डिग्रीवर असणार ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. अशात बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव दिसून येईल. पण तीन राशींच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या आहेत.
मीन राशी (Meen Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग लाभदायक ठरू शकतो. हे लोक त्यांच्या भविष्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. तसेच खूप विचार करून प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. जर हे लोक खूप मेहनत घेत असतील तर त्यांना भरघोस यश मिळू शकते. तसेच या लोकांनी केलेल्या चूका समाप्त होऊ शकतात. व्यवसाय क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो. जोडीदाराबरोबर सुरू असलेल्या समस्या समाप्त होऊ शकतात. तसेच या लोकांचा खर्च कमी होईल. जीवनात भरपूर आनंद येईल.
कर्क राशी (Kark Zodiac)
मंगळ बुधपासून निर्माण होणारा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. हा काळ जीवनात सुख शांती निर्माण करणारा राहीन. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. बौद्धिक क्षमतेमध्ये वृद्धी दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरीमध्ये भरघोस यश मिळू शकते. जीवनात सुख शांती दिसून येईल. व्यवसायात चांगला नफा मिळवू शकता. ट्रेडद्वारे चांगला लाभ मिळू शकता. लव्ह लाइफ उत्तम जाणार आहे. तसेच या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ बुधचा नवपंचम राजयोग आनंद घेऊन येणार असू शकतो. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. दीर्घ काळापासून अडकलेल्या समस्या समाप्त होऊ शकतात. आईच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. तुमच्या आवडत्या ठिकाणी मित्र किंवा कुटुंबाबरोबर जाईन. नव्या नोकरीसाठी जर अर्ज दाखल केला असेल तर या लोकांना कॉल येऊ शकतो. जीवनात पुढे जाऊ शकतात. तसेच या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)