Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राजयोग आणि नव पंचम योग निर्माण करते ज्याचा थेट परिणाम मानवी आयुष्यावर दिसून येतो. ८ ऑक्टोबर रोजी शुक्र आणि मंगळ नव पंचम राजयोग निर्माण करत आहे ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते तसेच काही लोकांना अपार धन संपत्ती प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊ या नशीबवान राशी कोणत्या?
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी नव पंचम राजयोग लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते तसेच धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते आणि कार्यक्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. व्यवसायात या लोकांना लाभ मिळू शकतो ज्यामुळे ते समाधानी राहतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल तसेच कामाच्या ठिकाणी व्यवसाय संदर्भात प्रवासाचे योग जुळून येतील जे शुभ ठरतील. तसेच या लोकांचा धार्मिक व मंगल कार्यात सहभाग वाढेन. कार्य क्षेत्रात यांची प्रगती होईल.
सिंह राशी (Leo Zodiac)
नवपंचम राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या दरम्यान हे लोक एखादी वस्तू, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. तसेच या दरम्यान हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. वैवाहिक जीवनात सुख संपत्ती लाभेल. पती पत्नी दरम्यान प्रेम वाढेन व नाते आणखी दृढ होईल. ते जोडीदाराबरोबर आनंदाने आयुष्य जगू शकतात. या लोकांना अडकलेले धन संपत्ती अन् पैसा मिळेल. नोकरीच्या शोधात असणार्या लोकांना नोकरी मिळू शकते. या लोकांच्या प्रोफेशनल जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येईल. विदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा गोचर लाभदायक ठरेन.
हेही वाचा : बक्कळ पैसा! ५० वर्षानंतर महाअष्टमीला निर्माण होणार दुर्लभ संयोग; तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
तुळ राशी (Tula Zodiac)
तुळ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या दरम्यान या लोकांचे धाडस वाढेन तसेच या लोकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तेज येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. या लोकांच्या करिअरसाठी हा काळ उत्तम आहे. या दरम्यान या लोकांच्या ठरवलेल्या योजना पूर्ण होऊ शकतात. या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळेन. तसेच अडकलेले कामे पूर्ण होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)