Navratri Weekly Horoscope 16th- 22nd October 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार साधारण सात दिवसांच्या अंतराने प्रत्येक ग्रहाच्या स्थितीत काही लक्षणीय बदल होत असतात, पूर्णतः राशी परिवर्तन किंवा नक्षत्र बदल होत नसला तरी मार्गी होणे, उदय- अस्त होणे किंवा अंश बदलणे असे सामान्य बदल हे आठवड्याच्या कालावधीत होत असतात. त्यातच आजपासून सुरु होणारा आठवडा हा शारदीय नवरात्रीमुळे आणखीनच खास ठरणार आहे. या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर होण्यासह काही दुर्मिळ व शुभ राजयोग सुद्धा तयार होत आहेत. १६ ते २२ ऑक्टोबर या आठवड्यात माता जगदंबा नक्की कोणत्या राशींच्या कुंडलीत सुखाचे दिवस, धनाचे योग व प्रगतीची संधी देणार आहे याविषयी ज्योतिषीय अंदाज पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ ते २२ ऑक्टोबरमध्ये काही राशींना होणार बक्कळ धनलाभ तर काहींना कष्ट.. तुमची रास काय सांगते?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

नवरात्र उत्सवात उत्साह कायम असेल, मात्र १८, १९ या दिवशी कोणतेही काम करताना सतर्कता बाळगा. अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. या दिवसांत तुम्हाला ज्या गोष्टी झेपणार आहेत त्याच करा. ज्या गोष्टी झेपणार नाही अशा गोष्टींचा मोह टाळा. उत्पन्नाचा आगामी काळासाठी गुंतवणूक म्हणून वापर करा.आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. अशा वेळी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची ताकद असो, या ताकदीचा गर्व करू नका. सर्व दिवसांत सतर्कता बाळगा. व्यवसायाबाबत धाडसी निर्णय घेताना विचार करा. अनावश्यक खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात पुढारकीपणासाठी मिरवू नका. जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीस तुमच्या शुभ गोष्टींना सुरुवात होईल. या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल हे लक्षात ठेवा. कायद्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असो, नियमांच्या चौकटीत राहा. त्यामुळे नुकसान होणार नाही. व्यवसायात नेहमीपेक्षा फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचा कामाचा ताण कमी होईल.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

हा आठवडा आपल्यासाठी प्रगतीची संधी घेऊन येत आहे. आपल्याला सुरु असणाऱ्या कामात लवकरच खूप मोठे यश हाती लागणार आहे. सर्व वरिष्ठ, कनिष्ठ तुमचे कौतुक करतील. नवीन कामाचा आरंभ करू शकता. तुमच्या कामाच्या किंवा वास्तव्याच्या ठिकाणी बदलाचे संकेत अपेक्षित आहेत. तुम्ही घडवलेला बदल तुमच्या धनप्राप्तीचे कारण ठरू शकतो.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

ज्या कामात अडथळे येत होते ते आता येणार नाहीत. तुम्ही तुमचा आळस बाजूला ठेवला पाहिजे. मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या. व्यवसायात देवाणघेवाण वाढेल. ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहील. नोकरदार वर्गाचे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. संतती सौख्य लाभेल. मानसिक समाधानासह प्रकृती ठणठणीत राहील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे, तुमचा समाजातील मान- सन्मान वाढीस लागल्याने तुम्हाला स्वतःविषयी अभिमान वाटण्याची सुरुवात होईल. सकारात्मकतेने माणसांना आकर्षित कराल. कुटुंबात तुमचे कौतुक होऊ शकते. वैवाहिक सौख्य व संतती सुख लाभण्याची चिन्हे आहेत. तुमच्या आयुष्यात येणारा नवा जोडीदार तुम्हाला धनलाभाचे मार्ग मोकळे करून देऊ शकतो.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

२०, २१ हे दोन दिवस भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही व्यवहार करायला गेलात तर फसवणूक होऊ शकते; तेव्हा कोणताही तोंडी व्यवहार करू नका. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अन्य दिवसांचा कालावधी चांगला असेल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय कामाची सुरुवात करू नका.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

या आठवड्यात इतरांच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका. त्यामुळे वादविवाद होऊ शकतो. तेव्हा या दिवसांत शांत राहा. नोकरदार वर्गाला कामाचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागेल. आर्थिक बाबतीत काटकसर करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाला विश्वासात घ्या. वैवाहिक सौख्य मिळेल. प्रकृती जपा.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आपली फायदे- तोटे पाहून खर्च करा. मित्र-मैत्रिणींशी जपून व्यवहार करा. मुलांच्या बाबतीत कठोर वाणी टाळा. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा. प्रकृती स्वास्थ्य जपा.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हा नियम येत्या आठवड्यात तुमचा तारणहार ठरू शकतो. असे केल्याने व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. खर्च जपून करा. संततीसौख्य लाभेल. कोणतेही कौटुंबिक निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मनाला शक्य तेवढं स्पष्ट विचार करू द्या जेणेकरून द्विधा मनस्थिती ओढवणार नाही.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

नवरात्र उत्सवाची सुरुवात अगदी आनंदी वातावरणात कराल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सतत वाटणारी चिंता मिटेल. कामकाजाला गती येईल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचा प्रस्ताव येईल. तो लाभदायक असेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

हे ही वाचा<< ‘तू ही दुर्गा’ उपक्रमाची दणक्यात सुरुवात! पांढऱ्या रंगात सजून फोटो अपलोड करा व मिळवा नथ जिंकण्याची संधी

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मनामध्ये कोणतीही अढी ठेवू नका.घाई करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनण्यासाठी प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत व्यवहार चोख ठेवावा लागेल. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri weekly horoscope 16th 22nd october 2023 mesh to meen these zodiac signs to get lakshmi ma blessing more money svs
Show comments