NCP, Ajit Pawar, Sharad Pawar Astrology: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व अजित पवार हे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. सध्या पक्षाची वाटचाल अत्यंत नाजूक झाली आहे. कुंभ राशीतील शनी भ्रमण, मेष राशीतील राहू भ्रमण, मकर राशीतील प्लुटो चे भ्रमण हे पक्षापुढे असंख्य अडचणी वाढविणार असून, या पाप ग्रहांचा अडथळा पक्षाला अगोदर पार करावा लागणार आहे. यात पक्षाची अनेक प्रकारची हानी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाल्याने, तात्पुरते त्यांना घड्याळ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. पक्षाला यावर तातडीने विचारविमार्श करावा लागणार आहे. पक्षाची कुंडली २०२४ च्या एप्रिल पर्यंत सुधारण्याची शक्यता कमीच असल्याने, नोव्हेंबरनंतर पक्षाला स्वतंत्र विचार करावाच लागणार आहे. नवे नाव व नवे चिन्ह यावरही बराच खल केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षातील फूट रोखण्यात नेतृत्वाला अपयश येईल अशी शक्यता दिसते आहे. पक्षाची वाटचाल दिशाहीन होते आहे की, काय अशी शंका यावी, अशी स्थिती असेल. त्यासाठी कुंभेचा शनी व मग मकर राशितील प्लुटो हे जबाबदारी असतील. मीन राशीतील शनी पासून पक्षाची पुढील वाटचाल पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.

दुसरीकडे शरद पवार यांच्या कुंडलीचा अभ्यास असे दर्शवतो की, ३१ जुलै पर्यंतचा संपूर्ण कालखंड अत्यंत तापदायक जाणार आहे. या कालखंडात त्यांना स्वतःला खूप जपावे लागेल.

हे ही वाचा<< २४ एप्रिल २०२४ ही तारीख अजित पवारांसाठी खूप महत्त्वाची कारण… ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांची भविष्यवाणी

तर याउलट, अजित पवारांच्या कुंडलीतही मेष राशीत असलेला हर्षल हा गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही, तथापि, पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहेत. मात्र या वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करतील. दिनांक २४ एप्रिल २०२४ ला मात्र पापग्रहांना पूर्ण छेद देऊन, सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp to be independent from november with new name and sign jyotish predicts sharad pawar ajit pawar astrology svs
Show comments