Vastu Tips : घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. घराविषयी प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असतो. आपलं घर एकदम परफेक्ट असावं, असे प्रत्येकाला वाटते. वास्तूशास्त्रामध्ये घर कसे असावे आणि घरातील प्रत्येक दिशा आणि जागेचे महत्त्व सांगितले आहे. वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, घरी जेवण करताना कोणत्या नियमांचे पालन करावे, याविषयीही माहिती दिली आहे. आज आपण कोणत्या दिशेने जेवण करायला बसावे आणि कोणत्या दिशेने जेवण करायला बसू नये, याविषयी जाणून घेणार आहोत.
कोणत्या दिशेने जेवण करायला बसावे?
वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, जेवण करायला उत्तर आणि पूर्व दिशेला बसावे. ही जेवणासाठी शुभ दिशा मानली जाते तर दक्षिण दिशा खूप अशुभ मानली जाते. शास्त्रानुसार, दक्षिण दिशेला जेवण करायला बसू नये नाहीतर अनेक अडचणी वाढू शकतात.
हेही वाचा : गणपतीबाप्पाकडून शिका या बहुमूल्य गोष्टी; जीवनात कधीच राहणार नाही दु:खी
कोणत्या दिशेने जेवण करायला बसू नये?
पश्चिम दिशेला कधीच जेवण करायला बसू नये. वास्तूशास्त्रानुसार, या दिशेला जेवण करायला बसल्यामुळे कर्ज वाढतात. त्यामुळे या दिशेला तोंड करुन कधीच बसू नये नाहीतर आर्थिक अडचणी वाढू शकतात, असे मानले जाते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)