Numerology : अंकशास्त्रानुसार, संख्यांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. तुमच्या आयुष्यात काही अंक शुभ असतात तर काही अशुभ. ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा रेडिक्स क्रमांक ५ असतो. तसेच, ५ व्या क्रमांकावर बुध ग्रहाचे राज्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वार्षिक क्रमांक ६ म्हणजे बुध ग्रहाची शुक्र ग्रहासोबत परस्पर मैत्री निर्माण होत आहे. तुमच्या संख्येशी वार्षिक संख्येचा ताळमेळ वर्षभर तुमच्या नशिबासाठी चांगला मानला जाईल. तसंच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली कामे या वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिअर :
यावर्षी तुम्हाला कार्यक्षम नेतृत्व क्षमतेच्या मजबूत गुणांचा वापर करावा लागेल, जी तुमच्याकडे आहे. यामुळे तुमच्यासाठी खूप काही तयार होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येच चांगले यश मिळेल. माहिती तंत्रज्ञान, वकिली आणि मुद्रणालयाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. तसंच न्यायालयीन परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा यश मिळू शकतं. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. या वर्षी तुम्ही कोणतीही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता.

आणखी वाचा : Relationship Tips: महिलांनी या सवयी सुधारल्या पाहिजेत, अन्यथा नातं तुटू शकतं

विवाहित जीवन आणि प्रेम जीवन:
वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष अनुकूल राहील. तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढेल आणि तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडाल. तुमचे नातेही मजबूत होईल. मुलांशी संबंधित सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत कोणताही व्यवसाय करत असाल तर या वर्षी तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते. मे-जून किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तुम्ही फ्लॅट किंवा जमीन खरेदी करू शकता.

आणखी वाचा : ग्रहांचा राजा सूर्याचा शनिदेवाच्या राशीत प्रवेश, या ४ राशींना मिळणार सरकारी नोकरी आणि बढती

आरोग्याच्या दृष्टिकोनातून:
त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. तसेच मार्च महिन्याच्या आसपास घशाचा त्रास होऊ शकतो, तुम्ही नियमित व्यायाम करा, तरच तुम्ही निरोगी राहू शकाल. वर्षाच्या मध्यात सर्दी, पडसं आणि छातीत जंतुसंसर्ग यांसारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year 2022 get immense success for people born on these dates mkulank 5 prp