Vastu Tips Calendar: आजपासून नवीन वर्ष २०२४ ला सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलली असतील. जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर ठेवले जाते. पण वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार, जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते. वास्तू शास्त्रानुसार, घरात कॅलेंडर लावण्याची देखील एक योग्य जागा असते. वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. चला तर आज आपण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेला लावल्याने घरात सुख-समृद्धी येऊ शकते जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन वर्ष सुरू होण्याआधीच किंवा सुरू झाल्यावर आपण उत्साहाच्या भरात नवं कॅलेंडर घरात आणतो आणि आपल्या घराच्या भिंतीवर अत्यंत उत्साहात त्याला टांगतो. किंवा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे जिथे जागा रिकामी आहे किवा जुने कॅलेंडर ठेवले आहे त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो. पण वास्तु शास्त्रमध्ये याचे काही नियम दिले आहेत. त्यानुसार आपण कॅलेंडर लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, कॅलेंडर लावताना काही गोष्टी पाळल्या नाहीत तर घरात नकारात्मकता येऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही २०२४ साठी कॅलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तुचे काही नियम नक्कीच लक्षात ठेवा. चला त्या नियमांबद्दल जाणून घेऊया.

(हे ही वाचा : ७ जानेवारीपासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? बुधदेव राशी बदल करताच २०२४ मध्ये अचानक होऊ शकते संपत्तीत वाढ )

वास्तुशास्त्रानुसार घरातील जुने कॅलेंडर हटविले पाहिजे?

काही ज्योतिषाचार्यांनुसार, जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये. वास्तूनुसार असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जांचा संचार सुरू होतो. घरातील जुने कॅलेंडर हटविणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही, असे सांगितले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टीं घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये. वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे, असा सल्ला दिला जातो.

कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? (Calendar Direction as per Vaastu)

वास्तुशास्त्र कॅलेंडर लागू करण्याच्या योग्य पद्धतींचे वर्णन करते. योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावल्यास आपल्या घरामध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा देखील पूर्व आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year 2024 vastu tips for calendar direction which direction should calendar be placed in vastu pdb