Shanidev Transit May 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव कलियुगातील कर्मदाता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनी करतात अशी आस्था आहे. यंदा शनीदेव तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत स्थिर झाले आहेत मात्र आता येत्या ५ जूनला शनी वक्रीअवस्थेत येण्यास सुरुवात करणार आहेत. १७ जूनला शनी पूर्णपणे वक्री होऊन कुंभ राशीत भ्रमण सुरु करणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार याचा प्रभाव काही राशींवर मोठया प्रमाणात दिसून येऊ शकते. ही चाल अनपेक्षित असल्याने याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला आकस्मित दिसून येऊ शकतो. याचा अर्थ प्रभावित राशींना अचानक प्रचंड लाभ किंवा संकटांचा अनुभव येऊ शकतो. आज आपण शनीच्या प्रभावाने फायद्यात राहू शकतील अशा राशींना नेमका काय लाभ होणार हे जाणून घेऊया…
शनीदेव १३९ दिवसात या राशींना बनवतील कोट्याधीश?
धनु रास (Dhanu Zodiac)
धनु राशीत शनी हे बाराव्या स्थानाचे स्वामी आहेत. तर येत्या ५ जूनपासून शनी हे तिसऱ्या स्थानी अधिक शक्तिशाली होणार आहेत ज्यामुळे तुमच्या राशीत केंद्र त्रिकोण राजयोग व अंशतः शश राजयोग सक्रिय होणार आहे. यामुळे तुम्हाला गुंतवणूक रूपात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला आयुष्याचा जोडीदार लाभण्याची ही वेळ दिसत आहे तसेच या नव्या व्यक्तीच्या रूपात तुम्हाला समृद्धी व प्रचंड धनलाभ मिळू शकतो. नोकरदार मंडळींना वरिष्ठांची अचानक वाहवा मिळू शकते याचा प्रभाव सुदैवाने आपल्या पदोन्नती व पगारवाढीवर दिसून येऊ शकतो. तुम्हाला वाहनखरेदीचे सुद्धा योग आहेत.
तूळ रास (Libra Zodiac)
शनीदेव उलट मार्गी चालत असल्याने तुम्हाला कुठल्याही कामाची पूर्ती करण्यासाठी थोडी शक्कल लढवायला लागू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित तसेच अनोख्या रूपाचे धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे नवनवीन गोष्टी करून पाहण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या इच्छेला हव्यासात बदलू देऊ नका. तुम्हाला आई व बहिणीच्या रूपात प्रचंड लाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात स्त्रीरुपी लक्ष्मीचा आशीर्वाद व साथ लाभण्याची शक्यता आहे. शनिदेव तुमच्या राशीचं गोचर कुंडलीत चौथ्या स्थानाचे स्वामी आहेत व ५ जून पासून शनी पाचव्या स्थानी भ्रमण करणार आहेत. यामुळे तुम्हाला येत्या काळात सन्मान व संपत्ती असा दुहेरी लाभ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा<< शुक्र गोचर होताच ३० मे पर्यंत ‘या’ राशींना होणार धनलाभ? कोट्यवधींचे मालक होण्याची संधी येऊ शकते दारी
मिथुन रास (Gemini Zodiac)
मिथुन रास ही २०२३ च्या सुरुवातीलाच शनीच्या साडेसातीतून मुक्त झाली आहे. तर आता वक्री अवस्थेत सुद्धा शनिदेव आपल्याला लाभदायी सिद्ध होऊ शकतात. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत शनी पुढील १३९ दिवस नवव्या भावात भ्रमण करणार आहेत. याचा प्रभाव तुमच्या नोकरी व आरोग्यावर विशेषतः दिसून येऊ शकतो. तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होतात त्याची पूर्ती होण्याची पूर्ण संधी आहे. तुम्हाला येत्या काळात वाणीवर प्रचंड नियंत्रण ठेवावे लागू शकते. कौटुंबिक सौख्य लाभू शकते. ऑफिसमधील सहकरी तुमच्यासाठी यशाची पायरी ठरू शकतात. याच रूपात प्रचंड धनलाभ होण्याची संधी आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)