Shani nakshatra gochar 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा १८१ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.
१८१ दिवस तीन राशीधारकांसाठी खास (Saturn Transit)
मेष
कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील १८१ दिवस शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
सिंह
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. १८१ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.
तूळ
शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १८१ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)