Lakshmi Narayan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील तीन दिवसांनी काही राशींच्या कुंडलीत शुक्र व बुधाची युती झाल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात शुभ व फायदेशीर योग मानला जातो. १४ जूनच्या दिवशी मिथुन राशीत बुध प्रवेश करणार आहेत या राशीत अगोदरच शुक्र विराजमान आहेत. मिथुन राशीत बुध व शुक्र एकत्र आल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. हा राजयोग तब्बल १८ दिवस कायम असणार आहे, त्यामुळे २ जुलै २०२४ पर्यंत खालील राशींना प्रचंड फायदा होण्याची चिन्हे आहेत. पाहूया लक्ष्मी नारायण राजयोग कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे.
लक्ष्मी नारायण राजयोग १८ दिवसात ‘या’ राशींना करणार धनवान
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
बुध व शुक्राची युती लक्ष्मी नारायण योगाच्या स्वरूपात सिंह राशीला लाभदायी ठरणार आहे. सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्याकडे येणार आहे. लवकरच आनंदी वार्ता तुमच्याकडे येणार आहे. व्यापारात तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. आरोग्य सुद्धा सुधारेल. जुने आजार दूर होतील. धार्मिक कार्यांमध्ये मन लागून राहील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
कन्या राशीच्या मंडळींसाठी बुध व शुक्राच्या युतीने तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायक आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावाने व्यावसायिक वर्गाला फायदा होऊ शकतो. आयुष्यात येणारे अडथळे एक एक करून आपल्या वाटेतून दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तणावातून मुक्त व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येईल. आरोग्याची काळजी घ्या.मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
बुध व शुक्राची युती झाल्याने बनणारा लक्ष्मी नारायण योग हा मिथुन राशीच्या मंडळींना धनवान बनवू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. कुटुंबासह सहलीचे नियोजन कराल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे. शेअर बाजारात नशीब आजमावून पाहू शकता. घरी एखाद्या पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. मदतभाव मणी ठेवावा.नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)