Shani Transit: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो. शनि ग्रह सध्‍या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहे. २९४ दिवस शनिदेव कुंभ राशीतच विराजमान राहणार आहेत. १८ मार्च रोजी कुंभ राशीत शनिदेवाचा उदय होणार आहे. शनिदेवाच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. २९४ दिवस शनिदेवाचे कुंभ राशीत विराजमान असणे काही राशींसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. पाहा कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी….

शनिदेव २९४ दिवसात ‘या’ राशींना बनवतील कोट्याधीश?

मेष राशी

शनिदेवाच्या हालचालीत होणारे बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरु शकते. २९४ दिवस या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. धनलाभासह समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

(हे ही वाचा : Surya And Guru Conjunction: एप्रिलमध्ये ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी देवगुरु-सूर्यदेवाची युती होताच मिळू शकतो बक्कळ पैसा)

सिंह राशी

२९४ दिवस शनिदेवाचे कुंभ राशीत असणे सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. शनिदेवाच्या कृपेने कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊ शकतात. प्रेमाच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात.

तूळ राशी

तूळ राशीसाठी २९४ दिवस शनिदेव आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचा बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूप चांगला असू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. या काळात संतती सुखाची इच्छा असणाऱ्यांना संतती सुख मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

 

Story img Loader