Shani Vakri For Next 45 Days: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण ३० वर्षे लागू शकतात. साडेसातीचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्याला बदलू शकतो हे आपण जाणताच आणि हा प्रभाव स्थापित करण्याची क्षमता केवळ शनीकडे आहे. सध्या शनी हा कुंभ राशीत स्थिर आहे. कुंभेत शनीच्या वास्तव्याचे हे दुसरे वर्ष चालू आहे व येत्या वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत शनी कुंभेतच वास्तव्याला असणार आहे. शनीच्या वास्तव्याचे ठिकाण सारखेच असले तरी भ्रमणाची चाल ही वेळोवेळी बदलत असते.जसे की आता शनीदेव हे पुढील ४५ दिवसांनी उलट दिशेने भ्रमंती सुरु करणार आहेत.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे ३० जून २०२४ पासून वक्री स्थितीत म्हणजेच उलट मार्गाने प्रवास करणार आहेत. हीच स्थिती त्यापुढील १३९ दिवस म्हणजेच नोव्हेंबर १५, २०२४ पर्यंत कायम असेल. १५ नोव्हेम्बरला संध्याकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनी मार्गी होतील म्हणजेच पुन्हा सरळ दिशेने चालू लागतील. अर्थात शनीच्या वक्र दृष्टीने काही राशींच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतील मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनीच्या वक्र दृष्टीने लाभ प्राप्त करू शकतील अशा नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

शनीच्या वक्र दृष्टीने ‘या’ राशींचे जीवन लागणार मार्गी

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या गोचर कुंडलीत शनी महाराज हे दहाव्या व अकराव्या स्थानाचे स्वामी आहेत व योगायोग म्हणजे ३० जून पासून शनी अकराव्याच स्थानी भ्रमण करणार आहेत. अशा स्थितीत निश्चितच मेष राशीच्या मंडळींना लाभदायक कालावधी अनुभवता येऊ शकतो. तुमच्या या वर्षातील कमानुरूप तुम्हाला पदोन्नती व पगारवाढीचा लाभ अनुभवता येईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात व तुम्ही कुटुंबासह अधिकाधिक वेळ घालवू शकता. आपल्याला मागील काही वर्षांत जे यश हुलकावणी देऊन जात होतं ते प्राप्त करता येईल. समाजात तुमच्या नावाला एक वेगळी ओळख प्राप्त होईल. अचानक व अनपेक्षित धनलाभामुळे घरी दारी आनंदी आनंद असेल. संतती प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणुकीसाठी हा कालावधी शुभ आहे.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी शनीचे भ्रमण होत आहे. अशावेळी नोव्हेंबर पर्यंत आपल्या वाटेतील सर्व अडथळे दूर होऊ शकतील. आर्थिक तंगीतून सुटका होईल. विनाकारण होणाऱ्या खर्चांना आळा बसेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा भार कमी होऊ शकतो. या कालावधीत जर आपण आता गुंतवणूक केली तर आपल्याला उत्तम फायदे मिळू शकतात पण त्याबरोबरच जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. आई वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने कुटुंबात चालू असणाऱ्या वादांवर तोडगा निघेल.

हे ही वाचा<< शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीच्या कुंडलीत पहिल्याच स्थानाचे स्वामी हे शनी महाराज आहेत. शनी उलट चाल करत असल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गांमधून धनप्राप्ती होऊ शकते. नोकरी व्यतिरिक्त अर्थजनाचे वेगवेगळे पर्यायी मार्ग शोधू शकता. आयुष्यात चालू असणारे चढ उतार दूर होतील परिणामी आयुष्य थोडे संथ होईल पण हा निवांतपणा तुम्हाला मानसिक शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो. कामाच्या निमित्ताने एखादी प्रवासाची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यांमधील सहभाग वाढेल. भागीदारीच्या स्वरूपात केलेल्या व्यवसायांमधून यश प्राप्ती होऊ शकते. जुने आजार मार्गी लागू शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader