Shani Vakri For Next 45 Days: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण ३० वर्षे लागू शकतात. साडेसातीचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्याला बदलू शकतो हे आपण जाणताच आणि हा प्रभाव स्थापित करण्याची क्षमता केवळ शनीकडे आहे. सध्या शनी हा कुंभ राशीत स्थिर आहे. कुंभेत शनीच्या वास्तव्याचे हे दुसरे वर्ष चालू आहे व येत्या वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत शनी कुंभेतच वास्तव्याला असणार आहे. शनीच्या वास्तव्याचे ठिकाण सारखेच असले तरी भ्रमणाची चाल ही वेळोवेळी बदलत असते.जसे की आता शनीदेव हे पुढील ४५ दिवसांनी उलट दिशेने भ्रमंती सुरु करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा