वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. एप्रिलमध्ये नऊ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा आहे. या महापरिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल, परंतु तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणता ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करेल आणि कोणत्या तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल महिन्यात प्रथम ग्रहांचा सेनापती मंगळ ७ एप्रिल रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रह ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. १३ एप्रिल रोजी देवांचा गुरू बृहस्पती गुरू मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र २७ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मेष राशीत प्रवेश करेल. तर १२ एप्रिललाच केतू ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ एप्रिल रोजी ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील. तसेच, चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. अशा प्रकारे एप्रिलमध्ये ९ ग्रह राशी बदलतील. तीन राशीच्या लोकांना या नवग्रहांच्या संक्रमणाचा विशेष लाभ होऊ शकतो.

Guru Transit 2022: १२ महिन्यानंतर गुरु ग्रह बदलणार रास, ‘या’ तीन राशींना मिळणार आर्थिक लाभ

मेष: ग्रहांचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. यासोबतच व्यवसायाचा विस्तारही होईल. पद प्रतिष्ठा वाढू शकते, ज्यामुळे लोक तुमची प्रशंसा करू शकतात.

सिंह: ग्रहांचा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच व्यवसायात फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. पगार किंवा पदोन्नतीत वाढ होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. यावेळी तुम्हाला अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल. ज्याद्वारे तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता.

तूळ: ग्रहांचा बदल तुमच्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रखडलेली कामे होऊ शकतात. तसेच जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला नफा मिळू शकतो. यावेळी भौतिक सुख व वाहन सुख मिळू शकते. यासोबतच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकंदरीत नवग्रहांचे बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात.