PM Modi & Nitin Gadkari Astrology: भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून दोन नेत्यांची नावे सदैव चर्चेत असतात ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी. जेव्हा विरोधी पक्षातील नेत्यालाही आपल्याच विरोधातील नेता आवडायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात होते. राजकारणात यापूर्वी अनेक असे अजातशत्रू होऊन गेले जसे की, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण इत्यादी. आता मात्र राजकारणाचा नूरच बदलला आहे. राजकारणाचे आर्थिक आलेख उंचावत चालले आहेत. आपल्या नंतर आपले राजकीय वारसदार आपलेच अपत्य असावे अशा पद्धतीच्या रांगा राजकारणात दिसू लागल्या आहेत. याही काळात राजकारणात मैत्री व मैत्रीत राजकारण न आणणारा अजातशत्रू म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे. याच नितीन गडकरींचे मूलांक व भाग्यांक येत्या काळातील त्यांच्या कामगिरीविषयी काय सांगतात, तसेच मोदींना गडकरींची कशी मदत लाभू शकते, हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींचे निर्णय वादग्रस्त ठरू शकतात, कारण..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० (१७- ०९- १९५०), या अंकांची बेरीज केल्यास १+७+९+१+९+५+०= ३२, ३+२= ५ मोदींचा भाग्यांक व मूलांक आपल्या समोर येतो. मोदींच्या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक आहे १+ ७= ८ आणि भाग्यांक आहे ५. आता नितीन गडकरी यांची जन्मतारीख. २७- ५- १९५७. यानुसार मूलांक येतो २+ ७= ९ व भाग्यांक येतो २+ ७+५+१+९+५+७= ३५, ३ +५= ९. एकूण दोन्ही जन्मतारखांचे बलाबल आपापल्या परीने योग्य असले तरी गडकरींच्या जन्मतारखेत ९ हा अंक खूपच बलवान ठरतो. मोदींच्या जन्मतारखेच्या (१+७= ८) ८ या मूलांकावर शनीचे वर्चस्व असते.

राज्यकारभारासाठी मंगळाचे वर्चस्व मोठे मानले जाते. देशाच्या हिताचे राजकारण जर बुद्धीच्या जोरावर केले तर त्यातून नक्कीच यश प्राप्त होते. शनीचे राजकारण हे हट्टीपणाचे व आततायीपणाचे असते अशा प्रभावाखाली घेतलेले निर्णय हे वादग्रस्त ठरू शकतात. अशावेळीची नितीन गडकरींची मदत म्हणजे ‘हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला’ अशी होणार आहे.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

२०२६ पासून नितीन गडकरींच्या संधी वाढणार!

बुध मंगळ त्रिएकादश योगातून तयार होणारा राजयोग पुढील काळातही उत्तम नेतृत्व निर्माण करेल. तसेच अडचणीच्या काळात आपल्या चतुरस्त्र डावांनी देशातील लोकशाहीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारून होणारा विरोध संपवून टाकेल. आश्वासने नकोत, पूर्तता करू हा त्यांचा कानमंत्र ठरेल. राजकीय आयुष्यात पुरेसे पर्याय असावेत. आंधळेपणाने केलेलं देशाचं राजकारण विनाशाकडे नेईल याची पुरेपूर जाणीव असणारी ही व्यक्ती भावी काळातील नेतृत्व घडवेल. जुलै २०२४ पर्यंत अष्टमेश चतुर्थात व गुरु षष्ठात, लग्नात शुक्र असल्याने तब्येतीची काळजी घ्यावी. श्रम करणे टाळावे. मानसिक स्वास्थ्य जपावे. २ मार्च २०२६ पर्यंत बुधाची अंतर्दशा व २०३५ पर्यंत कायम गुरु महादशा आपल्याला राजकीय क्षेत्रात बहुमानाचे पद प्राप्त करून देईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari kundali big change till 2035 jyotishi ulhas gupte predicts says narendra modi controversial decision will be saved by maharashtra leader astrology svs