ज्योतिषशास्त्रानुसार एकूण १२ राशी असतात आणि प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. राशीच्या स्वामी ग्रहाच्या स्वभावानुसारच कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेता येऊ शकते. आज आपण अशा राशींच्या मुलींबद्दल बोलणार आहोत ज्या स्वभावाने अत्यंत रागीट मानल्या जातात. विशेषतः जर कोणी त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्या खूप संतापतात. तर, जाणून घेऊया कोणत्या राशींच्या मुलींचा यात समावेश होतो.
मेष : या राशीच्या मुली अत्यंत रागीट असतात. असा तर त्यांचा स्वभाव मिश्किल असतो परंतु यांना कधी कोणती गोष्ट खटकेल याचा अंदाज लावणे कठीण असते. या राशीच्या मुली आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी असतात. या मुलींनी कोणतेही काम करायचे ठरवले तर त्या ती गोष्ट पूर्ण करूनच दाखवतात.
वृषभ : या राशीच्या मुलीही रागीट स्वभावाच्या असतात. अनेकदा रागात या मुली नाते तोडायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्या रागात कधी काय करून बसतील याची त्यांनाही कल्पना नसते. त्यामुळेच बरेचदा त्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यांचा राग लवकर शांतही होत नाही.
सिंह : सिंह राशीच्या मुली आत्मनिर्भर राहणे पसंत करतात. त्या आपले आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगतात. त्यांना आपल्या आयुष्यात इतर कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही. यांचा राग एखाद्या ज्वालामुखीपेक्षा कमी नसतो. त्यामुळे जेव्हा या रागात असतील तेव्हा त्यांच्यासमोर काहीही न बोलणेच उत्तम असते.
वृश्चिक : या राशीच्या मुली मेहनती आणि बुद्धिवान मानल्या जातात. परंतु या रागीट आणि जिद्दी स्वभावाच्या देखील असतात. त्या स्वाभिमानी असतात आणि जर कोणी त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हे अजिबात सहन होत नाही. त्यांचा स्वभाव खूप काळजी घेणारा असतो आणि त्या आपल्या प्रियजनांसाठी काहीही करण्यास तयार असतात.