Acharya Chanakya Quotes: केवळ भारतच नाही तर जगाभरातमहान तत्त्वज्ञ मानल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचा जन्म सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी झाला. त्यांनी राजकारण, लष्करी शक्ती, समाज आणि राष्ट्रवाद आधारितआधारित नीती शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो नंतर चाणक्य नीती म्हणून ओळखला जाऊ लागला. या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी अडीच हजार वर्षांपूर्वीच्याही आहेत. या नीतीग्रंथामध्ये त्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी अशा ४ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब करून माणूस आयुष्यभर इतरांपेक्षा ४ पाऊल पुढे राहू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या कर्माने आणि गुणांने श्रेष्ठ व्हा

आचार्य चाणक्य सांगतात, की कोणतीही व्यक्ती आपला जन्म, कुल, शरीर या धन-संपत्तीच्या आधरावर श्रेष्ठ नसतो तो आपल्या गुणांमुळे आणि कर्मांनी श्रेष्ठ ठरतो. एखादी व्यक्ती भलेही गरिब असो पण आपल्या प्रगाढ ज्ञानाच्या जोरावर तो महान ठरू शकतो. असा व्यक्ती सर्वांसाठी पूजनीय असतो.

हेही वाचा – शुक्र-बुधच्या युतीमुळे निर्माण होणार लक्ष्मीनारायण योग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल करिअरमध्ये यश, धन व प्रेम

प्रगतीची ही सूत्रे कायम लक्षात ठेवा

आयुष्यात प्रगतीसाठी प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. यामध्ये पैसे कमवण्याचे योग्य साधन, योग्य मित्र, योग्य वेळी योग्य निर्णय, पैसा खर्च करण्याची योग्य पद्धत याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्व गोष्टी प्रगतीकडे घेऊन जातात.

व्यक्तीने कसे वागावे

चाणक्य नीती असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने खूप भोळे नसावे किंवा खूप वाकडे वागू नये. हे दोन्ही मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकवू शकतात. व्यक्तीचा स्वभाव साधा असला पाहिजे पण त्यांच्या वागण्यात हुशारी असावी. असा गुणी व्यक्तीच या कलयुगात पुढे जाऊ शकतो.. असा गुणी व्यक्तीच या कलयुगात पुढे जाऊ शकतो.

हेही वाचा – Chanakya Niti : ‘या’ ७ प्राण्यांची झोप मोडणे पडू शकते महागात, जाणून घ्या काय आहे कारण

अनिश्चित गोष्टींच्या मागे धावू नका

एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छेने कोणतेही काम करणे चुकीचे नाही पण तो स्वार्थ डोक्यात जाऊ देऊ नये. अनिश्चितत गोष्टींच्या मागे लागून जे आहे त्याचा गोष्टींचा त्याग करू नये. असे केल्याने आजूबाजूच्या सर्व वस्तू नष्ट होतात. म्हणून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, काळजीपूर्वक विचार करा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not getting success in job business follow these 4 things mentioned in chanakya niti you will get immense wealth snk
Show comments