Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी बुज मुहूर्त असतो म्हणजेच या दिवशी लग्न, मुंडण, गृहप्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, घर-गाडी खरेदी यांसारखी शुभ कार्ये मुहूर्त न काढता करता येतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावेळी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य आहे असे नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर काही इतर गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो.
जव :
शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जव देखील खरेदी करू शकता. जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धन-संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल.
कवड्या :
कवड्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेला कवड्या विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. नियमानुसार देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा.
Vastu Tips : खूपच शुभ असतात ‘या’ भेटवस्तू; त्या देणे आणि इतरांकडून मिळणे बदलू शकते आपले नशीब!
श्रीयंत्र :
अक्षय्य तृतीयेला श्री यंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय्य तृतीयेचा दिवस घरामध्ये श्री यंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ आहे असे म्हणता येईल.
दक्षिणावर्ती शंख
दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे घरात ठेवल्याने नेहमी सुख-समृद्धी येते. विधिवत पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा. लक्षात ठेवा पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका.
घागर
अक्षय्य तृतीयेला घागरी खरेदी करणेही खूप शुभ आहे. घागरी विकत घेऊन घरात ठेवणे आणि त्यात सरबत भरून त्याचे दान करणे हेही शुभ आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)