November Graha Gochar 2022: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची दिशा बदलते, मार्गक्रमण होते किंवा कोणत्याही राशींमध्ये ग्रह स्थिरावतात तेव्हा त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम हा त्या ग्रहाच्या प्रभाव कक्षेतील राशींमध्ये दिसून येतो. नोव्हेंबर महिन्यात तीन प्रमुख ग्रहांच्या मार्गक्रमणाने अशाच हालचालींना वेग येऊ शकतो. अभ्यासकांच्या माहितीनुसार, वृश्चिक राशीत शुक्र, बुद्ध व सूर्य देव गोचर करणार आहेत, परिणामी १२ राशींवर त्याचा अप्रभाव दिसून येऊ शकतो. मुख्यतः तीन राशींच्या कुंडलीत येत्या ३० दिवसात मोठे बदल घडून येण्याचे संकेत आहेत. या तीन राशी कोणत्या व त्या राशीच्या व्यक्तींवर नेमका कसा परिणाम दिसून येणार हे आता आपण पाहुयात..

नोव्हेंबर महिन्यात बदलू शकतं या तीन राशींचं भाग्य

मेष

नोव्हेंबर महिन्यातील ग्रह गोचराचा प्रभाव मेष राशीत मुख्यतः दिसून येणार आहे. मेष राशीच्या मंडळींना ग्रहांच्या मार्गक्रमणाने संमिश्र अनुभव येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असू शकतो तर संशोधक व अभ्यासकांसाठी प्रगतीचे योग आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी येणारा ३० दिवसांचा कालावधी हा शुभ ठरू शकतो, याकाळात शक्य तितके वाद टाळा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

कर्क

वृश्चिक राशीत सूर्य स्थिर होताच कर्क राशीच्या मंडळींच्या भाग्यात याचे प्रभाव दिसून येऊ शकतात. सूर्याच्या तेजाने या मंडळीचे भाग्य उजळून निघू शकते, धनलाभाचा प्रबळ योग या मंडळींना आहे. कामात प्रगती व यशाचे योग आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पना वेळीच व योग्य रीतीने मांडण्याची सवय लावून घ्यायला हवी. या येत्या ३० दिवसात वैवाहिक जीवनात काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, जोडीदाराचं मत ऐकून घेण्याचा प्रयत्न करा.

शनिची साडेसाती कोणत्या राशीत सुरु आहे? नेमके किती दिवस टिकून राहणार प्रभाव, जाणून घ्या

तूळ

बुध ग्रहाने गोचर केल्यामुळे या बुधाची मूळ रास तूळमध्ये मोठ्या बदलांचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने येणारा काळ हा अत्यंत शुभ ठरू शकतो, व्यवसाय वृद्धीच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच शुक्र ग्रह गोचर करणार असल्याने आर्थिक लाभाची प्रबळ संधी आहे.

शनिने मार्गी होत साकारला दुर्मिळ ‘महापुरुष राजयोग’; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी

अर्थार्जनाचे अनेक स्रोत उपलब्ध होऊन आपल्याला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक सुखाने आपला येणारा महिना अत्यंत आनंदी ठरू शकतो. मतभेदाच्या वेळी तुम्हाला पडती बाजू घ्यावी लागू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

Story img Loader