Numerology Predictions for 2025 Number 4: कुंडली शास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती आणि तिचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे अंकशात्रात सोप्या गणिताचा आधार घेऊन व्यक्तीचे विविध पैलू आणि मानसिकता जाणून घेता येते. या संख्याशास्त्रात १ ते ९ अंकाची किमया आहे आणि या किमयेमध्ये पडद्याआड नऊ ग्रह उपस्थित असतात. या अंकशास्त्रात सध्या आपण मूलांकाचा वापर करून भविष्य निदान करणार आहोत. त्यामुळे तुमची जन्मतारीख दोन अंकांमध्ये असेल, तर तुम्हाला ती एका अंकात रूपांतरित करावी लागते. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख २२ असेल तर २+२=४. म्हणजे तुमचा मूलांक ४ आहे.

तर चार मूलांकाचे लोक स्वबळावर स्वभावतालचे जग बदलण्याची हिंमत मनात बाळगतात. यांना स्वतःचे काम स्वतःच करायला आवडते. त्याचबरोबर त्यांना जीवनात अनेक अडचणींना सामोरेसुद्धा जावे लागते. तर येणाऱ्या वर्षात त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या मित्रांकाची मदत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, एकूणच २०२५ हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी कसे जाणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

The luck of these 3 zodiac signs can shine on January 12th Mars
१२ जानेवारीला चमकू शकते ‘या’ ३ राशींचे नशीब! नवीन वर्षात मंगळ करणार पुनर्वसु नक्षत्रामध्ये प्रवेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Somwati Amavasya 2024
सोमवती अमावस्येच्या दिवशी दुर्लभ संयोग; ‘या’ ४ राशींवर बरसणार महादेवाची कृपा, मिळणार बक्कळ पैसा!
Budh gochar in Capricorn
१२ महिन्यानंतर बुध करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
shukra gochar 2025 venus rashi parivartan in new year 2025 these zodiac sign get more profit
२०२५ मध्ये १० वेळा बदलणार शुक्राची चाल, ‘या’ राशींना मिळेल अमाप पैसा अन् पद आणि प्रतिष्ठा
Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाचा…Astrology Predictions Number 3: ‘या’ जन्मतारखेसाठी २०२५ ठरेल मोठे बक्षीस! उत्तम आरोग्य, नोकरीत चांगले योग; वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

ज्यांची जन्मतारीख ४,१३,२२ व ३१ आहे अशा लोकांचा मूलांक ४ असतो. या अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आढळतो. सध्या येणारे वर्ष २०२५ या वर्षाची बेरीज २+०+२+५= ९ आहे. ९ अंकाचा म्हणजेच मंगळाचा प्रभाव या मूलांकावर असणार आहे. त्यामुळे ४ मूलांकाला हर्षल बरोबर मंगळाची साथ लाभणार आहे. या दोघांच्याही एकत्र येण्याने उतावळेपणाचा वेग या तारखांमधून ४,१३,२२, ३१ जास्त प्रमाणात दिसून येईल, त्यामुळे खूप सावधतेने हा वर्षप्रवास करावा लागेल. श्रम आणि बुद्धीच्या जोरावर ही माणसे यश संपादन करत असतात. तसेच अतिशय न्याय बुद्धीने वागणारी असतात, त्यामुळे यांच्या परखड भूमिकेवर टीका होण्याची शक्यता दिसून येते.

त्यामुळे शांतपणे वागून निर्णय घ्यावे. उद्योगधंद्यात मूलांक १ आपल्याला खूप मदतीचा ठरेल. मूलांक १ ची निवड केल्याने आपल्यावरील खूप भार हलका होईल. शक्यतो काळा व लाल रंग कटाक्षाने टाळावा. २,४ व ७ या मित्रांकाच्या बाबतीत खूप हळवेपणा, प्रेम, भावनिक गुंतवणूक वाढेल. हळवेपणा हा पावसाच्या सरीप्रमाणे असतो, तो फारकाळ टिकत नाही. या वर्षातील ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने शुभदायक ठरतील. मूलांक ५ आपल्यासाठी खूप मदतीचा ठरेल. तर यापुढील लेखात आपण मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत…

(सूचना : सध्या काही संख्याशास्त्र अभ्यासक चार अंकावर राहू ग्रहाचा अंमल आहे व ७ अंकावर केतू ग्रहाचा अंमल आहे असे मानतात. पण, जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रतज्ज्ञ कीरो माँट्रोज स्ट्रायहॉर्न (montrose Strayhorn) यांच्या लिखाणानुसार ४ व ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर हर्षल व नेपच्यून ग्रहाचा अंमल आहे. )

Story img Loader