Numerology Predictions for 2025 Number 6तुमच्यापैकी अनेक जण जीवनात पुढे काय होणार आहे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिस्थिती कशी असेल हे जाणून घेण्यासाठी कुंडली आणि ज्योतिषाची मदत घेतात. पण, तुमच्या मूलांकावरूनही याबाबत बरीचशी माहिती मिळते. याला अंकशास्त्र म्हणतात. अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वत:बद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. अंकशास्त्राद्वारे तुम्हाला मूलांकानुसार तुमच्या भविष्यात नेमकं काय घडेल, नोकरी, व्यवसाय, आर्थिक, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काय होईल हे जाणून घेता येईल. आपण आज ६ मूलांक असणाऱ्या व्यक्तीला नवीन २०२५ हे वर्ष नेमकं कसं जाईल हे पाहणार आहोत.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला झाला असेल, तर या तारखांचा मूल्यांक सहा येतो. सहा अंक शुक्र ग्रहाच्या अमलाखाली येतो. हा अंक ऐहिक सुखाचा निदर्शक आहे. या व्यक्ती कला शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असतात, विशेष म्हणजे या व्यक्ती खूप आदराने व लीनतेने वागतात.

urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Shani Gochar 2024
शनीच्या कृपेने येणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम, पैसा अन् प्रतिष्ठा
The luck of these zodiac signs can shine on January 1st Mars and Moon
१ जानेवारीला चमकू शकते ‘या’ राशींचे नशीब! मंगळ अ्न चंद्र निर्माण करणार शक्तीशाली धन योग; जबरदस्त यश मिळण्याचे योग
ketu gochar 2025 positive impact on horoscope
नवीन वर्षात केतू बदलणार चाल, २०२५मध्ये या तीन राशींचे नशीब पलटणार! नव्या नोकरीसह मिळू शकतो अपार पैसा, धन-दौलत-पद-प्रतिष्ठा
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

मूलांक ६ ला कसे जाईल नवीन वर्ष?

यावर्षी २०२५ साल म्हणजे २+०+२+५ = ९ अंकाबरोबर सहा अंकाचा वर्षभर प्रवास असणार आहे, त्यामुळे मंगळातील शूरता, साहस यांच्या स्वभावात येईल पण त्यांचा त्यांनी दुरुपयोग करू नये. मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी फटकळपणे वागू नये. नाती जपावीत मात्र अन्याय, फसवणूक या विरोधात मंगळाची मदत घेऊन नक्कीच समोरच्याला आपली हिंमत दाखवावी.

फॅशन कलाकार, सौंदर्य प्रसाधने यांचा व्यवसाय शुक्र मंगळाच्या साहाय्याने उत्तम चालेल. भावनिक स्तरावर कोणतीही नाती निर्माण करू नये. प्रेमविवाहात निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सट्टा, रेस गैरमार्गाने पैसा कमावण्याच्या उद्योगधंद्यात भाग घेऊ नये. नको त्या अमिषाला बळी पडून दुप्पट पैसा अशा योजनांना बळी पडू नये.

Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

हिरवा, पिवळा, पांढरा रंग नियमित वापरात ठेवावा. धार्मिक यात्रांनिमित्त प्रवास होतील. सहा महिन्यांनंतर खूपश्या समस्या निवारण होतील. विशेष करून मार्च, डिसेंबर महिना अधिकच उत्तम आणि लाभदायक ठरतील, कलाक्षेत्रातील लोकांना हे वर्ष कलेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल.

Story img Loader