2025 Astrology Predictions for Number 7 : अंकशास्त्रात व्यक्तीच्या मूलांकावरून भविष्यात होणाऱ्या किंवा पुढे घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज लावता येतो. तर यासाठी जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक शोधला जातो. मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंत असते. मूलांक शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. जर तुमच्या जन्मतारखेचा एकांक ७ येत असेल, तर तुम्हाला हे वर्ष कसे जाईल? तुमच्या स्वभावात, करिअरमध्ये काही बदल होणार का? कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल याबद्दल आपण आज या लेखातून जाणून घेऊ…

ज्यांची जन्मतारीख ७, १६ व २५ यापैकी आहे, त्यांचा मूलांक ७ असतो. अशा लोकांची मानसिकता स्थिर, अति कोमल, भावनाशील असते; पण चेहरा मात्र खूप गंभीर असतो. मूलांक ७ असणाऱ्या व्यक्तींना पुढे घडणाऱ्या घटनांची अस्पष्टपणे जाणीव होत असते. वृत्तीने नाही; पण मनाने ही माणसे आध्यात्मिक असतात. स्वभाव शांत, अतिशय कृतिशील, अल्प व्यवहारज्ञान यामुळे ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर फसण्याचे प्रसंग वरचेवर येत असतात. जलप्रवासाची खूप आवड, आयुष्यात आश्चर्यकारक बदल, गूढ शक्तीचे आकर्षण, उत्तम प्रतिभा, निर्मळ बोलणे, नि:स्वार्थी वृत्ती, अशी ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींची ओळख सांगितली जाते.

31 December Marathi Panchang
३१ डिसेंबर पंचांग: वर्षाच्या शेवटच्या दिवशी होईल अनपेक्षित लाभ, बाप्पाच्या कृपेने समस्या होतील दूर; वाचा १२ राशींचे मंगळवारचे भविष्य
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Hanuman Favourite Zodiac Signs
Hanuman Favourite Zodiac : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर दिसून येईल हनुमानाची कृपा, प्रत्येक क्षेत्रात होणार आर्थिक लाभ
2025 Numerology Predictions Number 8 in Marathi
Numerology Predictions Number 8: २०२५ मध्ये ‘या’ जन्मतारखांना लाभणार शनीची साथ! व्यवसायात फायदा तर चहुबाजूंनी बरसणार सुख; वाचा, उल्हास गुप्तेंची भविष्यवाणी
January 2025 Planet Transits Astrology
January 2025 Planet Transits : जानेवारीत ‘या’ राशींना मिळणार आनंदाची गोड बातमी; सूर्य, बुधासह ५ ग्रहांच्या राशी परिवर्तनाने धनलाभासह प्रत्येक कामात यश
Budh Gochar
जानेवारीमध्ये बुध करणार दोनदा गोचर, ‘या’ तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, करियर – व्यवसायात होणार लाभ
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
Numerology people whose name starts with the N letter read Personality traits
‘N’ अक्षरापासून नाव असलेल्या व्यक्तिचा स्वभाव कसा असतो?

हेही वाचा…Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

२०२५ या वर्षाच्या संख्येची बेरीज २ + ० + २ + ५ = ९ (नऊ) आहे. ९ हा अंक मंगळाचा आहे. त्यामुळे ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात मंगळाचे अस्तित्व समाविष्ट असेल. त्यामुळे संशोधन कामात यांना एक विशेष मदत लाभेल. कामाचा वेग वाढेल. त्यामुळे उर्वरित वेळ ते दुसऱ्या कामासाठी देऊ शकतात. हळव्या स्वभावात थोडा तिखटपणा, बेरडपणा येईल. त्यामुळे यांच्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि मानसिक स्थैर्य लाभेल.

औषधे, फॅशन, सिनेमा, नाट्य क्षेत्रात यांचे नवीन प्रयोग यशस्वी होतील. त्यातून आर्थिक लाभही होईल. नव्या ओळखी, नवीन परिचय, नवीन कामे हाती येतील. त्यामुळे ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष सुख-समाधानाचे जाईल. पांढरा रंग तुमच्यासाठी सुखदायक ठरेल. त्याचप्रमाणे मे व ऑक्टोबर हे दोन महिने तुमच्यासाठी शुभदायक ठरणार आहेत. तर, अशा प्रकारे ७ मूलांक असणाऱ्यांचे वर्ष सरेल. यापुढील लेखातून आपण मूलांक ८ असणाऱ्यांचे २०२५ हे वर्ष कसे जाईल याबद्दल जाणून घेणार आहोत.

Story img Loader