Numerology Predictions for 2025 Number 8 : ज्योतिषशास्त्रात जन्मतारीख आणि मूलांकांना विशेष महत्त्व असते. त्यावरून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत अंदाज लावला जातो. तर, मूलांकाच्या आधारे करिअर निवडणे किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठीसुद्धा खूप मदत होते. त्यामुळे सुरुवातीला तुमचा मूलांक कसा काढला जातो हे जाणून घेऊ. जर तुमची जन्मतारीख १७ असेल, तर १ + ७ = ८. म्हणजे तुमचा मूलांक ८ आहे. तर आज आपण या लेखातून ८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे नवीन वर्ष कसे जाईल याबद्दल जाणून घेऊ…

ज्यांची जन्मतारीख ८, १७, २६ आहे, अशा व्यक्तीचा मूलांक ८ असतो. ८ या अंकावर शनी ग्रहाचा अंमल असतो. संख्याशास्त्रात ८‌ या अंकाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. पण, खरं तर हा मोठा गैरसमज आहे. कारण- १ ते ९ या मूलांकात कोणताच अंक हा शुभ वा अशुभ नसतो. काळाप्रमाणे जन्मतारखेतील अंक आपले गुण, अवगुणाचे प्रदर्शन करीत असतात. चीनमधील अति‌ श्रीमंत, बुद्धिमान माणसांच्या तारखात सतत येणारा आठ त्यांना‌ खूप शुभदायक ठरला‌ आहे, हे अभ्यासातून केलेले निदान आहे.

Astrology Predictions Number 3 in Marathi
Astrology Predictions Number 3: ‘या’ जन्मतारखेसाठी २०२५ ठरेल मोठे बक्षीस! उत्तम आरोग्य, नोकरीत चांगले योग; वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shani Gochar 2024
शनीच्या कृपेने येणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम, पैसा अन् प्रतिष्ठा
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
Astrology Predictions Number 7 in Marathi
Astrology Predictions Number 7: तुमच्या जन्मतारखेचा एकांक ७ येतो का? सुख-समाधानात सरेल नवीन वर्ष, होईल लाभच लाभ; वाचा, ज्योतिषाचार्य काय सांगतात…
2 January 2025 Rashi Bhavishya In Marathi २ जानेवारी राशिभविष्य
2 January Horoscope: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन संधी येणार चालून, कोणाला लाभ तर कोणाची रखडलेली कामे होतील पूर्ण, वाचा गुरूवारचे भविष्य
Mesh To Meen Horoscope On 30 December
३० डिसेंबर पंचांग: सोमवती अमावस्या ठरणार भाग्यशाली! चिंता दूर, व्यवसायात लाभ तर मेष ते मीनपैकी यांचा दिवस जाईल आनंदात
Shadashtak Yog Astrology
वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, सूर्य-गुरुच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन

हेही वाचा…Astrology Predictions Number 7: तुमच्या जन्मतारखेचा एकांक ७ येतो का? सुख-समाधानात सरेल नवीन वर्ष, होईल लाभच लाभ; वाचा, ज्योतिषाचार्य काय सांगतात…

उद्योगधंद्यांसाठी खूप फायदेशीर

२०२५ या वर्षाचा एकांक २+०+२+५ = ९ येतो. बघायला गेलं तर ९ आणि ८ हे एकमेकांचे मित्रही नाहीत आणि‌ शत्रूही नाहीत. पण, ते‌ जेव्हा एकत्र येतात, तेव्हा माणसाच्या जीवनात, वागण्यात एक वेगळेच वेगळेपण जाणवते. विशेषतः २०२५ सालात ८ मूलांक असणाऱ्यांना लाभणारी शनीची साथ खनिज, तांबा, पितळ या उद्योगधंद्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. तसेच आठ मूलांक असणाऱ्या व्यक्ती मंगळाच्या सहवासामुळे मेहनत करून यश मिळवतील.

उत्तम आत्मविश्वास, शूर व हाताखालील लोकांवर उत्तम नियंत्रण, अशी ८ मूलांक असणाऱ्यांची ओळख असते. ८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना विशेषतः ३ व ६ हे मूलांक असणाऱ्या व्यक्ती साह्यभूत ठरतात. कारण- ते ८ कडे आपला विश्वासू मित्र म्हणून पाहतात. त्यामुळे उद्योगधंद्यात ३ व ६ हे मूलांक असणाऱ्या व्यक्तींशी केलेली भागीदारी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरते.

८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींनी २०२५ वर्षात सहकारी निवडताना विशेषत: ३ व ६ या मूलांकाच्या व्यक्ती लक्षात घ्याव्यात. तसेच प्रेमसंबंधातही ८ मूलांकाच्या व्यक्तीला ३ व ६ या मूलांकाच्या व्यक्ती खऱ्या अर्थाने समजून घेतील. तसेच अशा व्यक्तींशी केलेले विवाह सुखदायक ठरले आहेत. बँक, कायदे, शिक्षण क्षेत्रात ८ मूलांकाच्या व्यक्ती उत्तम कामगिरी बजावतील. त्याचप्रमाणे त्यांना मार्च, मे, ऑक्टोबर, डिसेंबर हे महिने खूप शुभदायक ठरतील. तसेच ८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींनी अति गडद रंग टाळावा. पुढील लेखातून आपण ९ हा मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे नवीन वर्ष कसे जाणार याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Story img Loader