2025 Astrology Predictions for Number 2 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांची रास, जन्म मूलांक आणि भविष्य ठरवले जाते. ग्रहांच्या संक्रमणामुळे भविष्यात होणाऱ्या अनेक गोष्टी काही प्रमाणात आपल्याला कळतात. तसेच अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीचे तिच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्यसुद्धा ओळखता येते. तर काही दिवसांतच २०२५ या नवीन वर्षाला सुरुवात होईल. येणारे नवीन वर्ष आपल्याला कसे जाईल याची उत्सुकता आपल्या सगळ्यांमध्येच असते. कारण – नवीन वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. हे संकल्प वर्षभरात झाले तर त्याचा एक वेगळाच आनंद वर्षाच्या शेवटी आपल्याला होतो.
तर याच पार्श्वभूमीवर आपण ‘मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन?’ या लेखातून आपण मूलांक १ चे येणारे वर्ष कसे जाईल हे जाणून घेतले. तर आज आपण मूलांक २ चे २०२५ हे वर्ष (Astrology Predictions Number 2) कसे जाईल याबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्या लोकांची जन्मतारीख २,११,२० व २९ आहे, अशा व्यक्तींचा मूलांक २ असतो. दोन या अंकावर चंद्र ग्रहाचा अंमल असतो. कोमल, संवेदनशील आणि हळवेपणा असे भावविशेष शब्द यांच्या चंद्रकोषात भरलेले असतात. त्यामुळे यांचा मृद स्वभाव यांना स्वतःलाच खूप अस्वस्थ करत असतो. मात्र, यावर्षी दोन अंकांच्या जीवनप्रवासात मंगळाची कणखर साथ लाभणार आहे. त्यामुळे यावर्षी घेतलेले बरेच निर्णय साहसी व अचूक ठरतील.
केवळ मंगळाच्या पराक्रमी सहवासामुळे त्यांचे भावविश्व खूप बदलले जाईल. मात्र, या वागण्याचा अतिरेक होऊ नये याची त्यांनी प्रकर्षाने काळजी घेणे सुद्धा गरजेचे ठरेल. नोकरी, व्यवसायातले काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास हा काळ उत्तम ठरेल. पण, निर्णय घेताना उतावळेपणा टाळावा. स्वतःला सावरण्याचे भान यावर्षी उत्तम लाभेल. कोर्ट कचेरीतील निर्णय किंवा प्रॉपर्टी संबंधित एखादा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नेहमी स्वतःकडे बघताना कमीपणा घेण्याच्या न्यूनतम भूमिकेत बदल करणे, पुढील जीवन प्रवासासाठी योग्य ठरेल आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल. तर यापुढील लेखातून आपण मूलांक ३ असणाऱ्यांचे नववर्ष कसे जाईल हे जाणून घेणार आहोत…