Ank Jyotish Ganesh Chaturthi 2024 Special: आपल्या आयुष्यात पुढे काय घडेल आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिस्थिती कशी असेल हे जाणून घेण्यासाठी लोक जन्मकुंडली आणि ज्योतिषाची मदत घेतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुमच्या मूलांक क्रमांकावरूनही बरीच माहिती मिळू शकते. याला अंकशास्त्र म्हणतात. अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वतःबद्दलही बरेच काही जाणून घेऊ शकता. अंकशास्त्राद्वारे, येथे तुम्ही तुमच्या मूलांकानुसार तुमच्या भविष्याबद्दल जाणून घेऊ शकाल. अंक शास्त्रानुसार ५ मूलांक असलेल्या लोकांवर गणपतीची विशेष कृपा होते. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल मूलांकाद्वारे जाणून घेऊ शकता.
५, १४ आणि २३ ही जन्मतारीख असलेल्या लोकांचा मूलांक असतो ५
मूलांकाची गणना१ ते ९ पर्यंत होती, जी जन्मतारेखनुसार ठरते जर तुमचा जन्म १, २, ३, ४, ५, ६, ७, ८. ९ यापैकी असेल तो अंक तुमचा मूलांक असतो. पण जर तुमची जन्मतारीख ९च्या पुढे म्हणजे दोन अंकी असेल (जसे की, ११, ३१) तर त्यांची बेरीज करून जो एक अंक येईल तो तुमचा मूलांक असतो. उदा. जर तुमचा मूलांक १४ असेल तर १ अधिक ४ उत्तर ५ येईल म्हणून तुमचा मूलांक ५ असेल. त्याचप्रमाणे तुमची जन्म तारीख २३ असेल तर २ अधिक ३ उत्तर ५ येईल त्यामुळे तुमचा मूलांक ५ असेल.
हेही वाचा – बुधादित्य योगामुळे ‘या’ आठवड्यात सुर्यदेव करणार कृपा! कर्कसह या राशींच्या लोकांना मिळेल यश अन् पैसा
बुधवारी गणपतीची पूजा करणेही लाभदायक ठरते
५ मूलांकाचा स्वामी बुध असतो. गणेश ही बुध ग्रहाची कारक देवता मानली जाते. यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. यानिमित्ताने ५ क्रमांक असलेल्यांवर बाप्पाची विशेष कृपा होईल. शास्त्रानुसार श्रीगणेशाची आराधना केल्याने शत्रू आणि ग्रहांच्या प्रभावापासून रक्षण करता येते, म्हणूनच गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते. त्यामुळे माणसाला धन, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.
मूलांक ५ क्रमांकाच्या लोकांनी गणेश चतुर्थीला हे उपाय
मूलांक ५ क्रमांकाच्या लोकांनी गणेश चतुर्थीला हे उपाय करावेत, असे मानले जाते की या गोष्टी केल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.
- गणपतीला दुर्वा अर्पण करा
- हिरव्या वस्तू दान करा
- मुलांना वाचन आणि लेखन साहित्य भेट द्या
- गाईला हिरवा चारा द्या.
हेही वाचा –गणपतीला प्रिय आहेत ‘या’ ३ राशी! जाणून घ्या कोणत्या राशींवर असते बाप्पाची विशेष कृपा?
गणेश मंत्र
एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात।।
गणेश चतुर्थीच्या दिवशी मूलांक ५ असलेल्या गणेश मंत्राचा जप १०८ वेळा करावा, भगवान गणेशाचा हा शक्तिशाली मंत्र जीवनात आनंद आणतो. बुद्धी देणारा भगवान गणेश त्यांचे जीवन संपत्ती आणि धान्यांनी भरतो. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील सर्व विघ्न नष्ट करतात.
(टिप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
© IE Online Media Services (P) Ltd