Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार, ११ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. धैर्य, प्रामाणिकता, संवेदनशीलता व अध्यात्म याचा संगम साधणारा असा हा अंक आहे. आपण अनेकदा पाहिलं असेल की घड्याळात, मोबाईलमध्ये जेव्हा ११: ११ अशी वेळ दिसते तेव्हा अनेकजण देवाच्या पाया पडतात किंवा हात जोडून एखादी इच्छा व्यक्त करतात. असं का केलं जातं? ११: ११ दिसल्यावर तुमच्या इच्छा पूर्ण होतात का? या अंकाला इतकं महत्त्व का आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अंकशास्त्रानुसार ११: ११ ही वेळ नव्या सुरुवातीचा संकेत मानला जातो. दिवसभरातील प्रहर बदलण्याच्या आधी तुम्हाला सूचित करणारी ही वेळ असते. दुपारी व रात्री १२ नंतर दिवसातील प्रहर बदलतात, त्याआधीच तुम्हाला होणाऱ्या बदलांसाठी तयार राहण्याचे संकेत ही वेळ देत असते. समजा तुम्हाला न ठरवता वारंवार नेमक्या याच वेळेला घड्याळ किंवा मोबाईल दिसत असेल तर हा एक संकेत असू शकतो. इंग्रजीत ११: ११ या योगाला एंजेल नंबर्स असे संबोधले जाते. अंकशास्त्राच्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा निव्वळ योगायोग नसून यातून युनिव्हर्स तुम्हाला काही संकेत पाठवत असू शकतो.

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Baba Vanga Nostradamus prediction 2025 in marathi
Baba Vanga, Nostradamus Predictions : २०२५ मध्ये पृथ्वी होणार नष्ट, विनाशकारी युद्ध, भूकंप अन् ज्वालामुखीचा उद्रेक! बाबा वांगा अन् नॉस्ट्राडेमसची भयभीत करणारी भविष्यवाणी
2025 Numerology Predictions Number 9 in Marathi
Number 9 Numerology Predictions: ‘या’ जन्मतारखांवर वर्षभर राहील मंगळाचा प्रभाव! उद्योगधंद्यांत यश, तर ‘या’ गोष्टी टाळणे योग्य; वाचा, उल्हास गुप्तेंची भविष्यवाणी…
31 December Marathi Panchang
३१ डिसेंबर पंचांग: वर्षाच्या शेवटच्या दिवशी होईल अनपेक्षित लाभ, बाप्पाच्या कृपेने समस्या होतील दूर; वाचा १२ राशींचे मंगळवारचे भविष्य

११: ११ अशी वेळ दिसल्यावर आपल्या आयुष्यात नवीन टप्पा सुरु होणार असल्याचे मानले जाते, अशावेळी तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या शक्तीकडे प्रार्थना करून आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करावी असा समज आहे. यावेळी तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण होते असेही अनेकजण म्हणतात. पण यावर तुमचा किती विश्वास आहे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सहसा जेव्हा आपण अगदी श्रद्धेने एखादी गोष्ट मोठ्याने म्हणतो तेव्हा जगातील शक्ती त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात, यात कुठलेही ग्रह तारे अंधश्रद्धा नसून तुमच्या स्वतःच्या मनाची मानसिक तयारी दिसून येते.

Vastu Shastra: देवासमोरील दिवा विझणं खरंच अशुभ असतं? अशा वेळी काय करावं? पौराणिक उत्तर जाणून घ्या

११: ११ या वेळेनंतर आयुष्यात बदलाला सुरुवात होते अशी मान्यता आहे. प्रलंबित निर्णय घेण्यासाठी ही वेळ अचूक मानली जाते. जर समजा तुम्हाला वारंवार ११: ११ दिसत असेल तर फार काही नाही निदान कामातून ब्रेक घेऊन दोन मिनिट शांत बसू शकता. जेणेकरून तुमच्या डोळ्यांना,मनाला ,मेंदूला आराम मिळेल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सलग काम करताना असे छोटे ब्रेक घेत राहणे हे तुमच्या कामाचा वेग अधिक वाढवू शकते .

(टीप- हा लेख माहितीपर असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

Story img Loader