अंकशास्त्राच्या आधारे, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संख्या जोडून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बरेच काही शोधले जाऊ शकते. त्यामुळे महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. चंद्रचा मूलांक २ आहे आणि चंद्र शीतलता, शांतता आणि सौंदर्याचा घटक मानला जातो. मूलांक २ असलेल्या लोकांचा स्वभाव देखील खूप आकर्षक असतो. चला तर मग जाणून घेऊया, मुलांक २ असलेल्या लोकांविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. ज्या लोकांचा मूलांक संख्या २ आहे. अशा लोकांची बौद्धिक क्षमता खूप चांगली मानली जाते. त्यामुळे हे लोक आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रत्येक कामात यश मिळवतात आणि त्यांना भरपूर पैसाही मिळतो.

२. या लोकांचा स्वभाव शांत असतो. तसेच त्यांचे बोलणेही खूप गोड असते. या गुणामुळे हे लोक सर्वांचे लाडके राहतात.

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

३. मूलांक २ असलेले लोक त्यांच्या कल्पना आणि तत्त्वांवरील दृढतेमुळे इतर लोकांसाठी प्रेरणा ठरतात. तर, हे लोक कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत आणि संयमाने काम करतात, ज्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रगती होते.

४. अंकशास्त्रानुसार, मूलांक २ असलेल्या व्यक्तीला लोकांसोबत वेळ व्यथित करायला आवडते.

आणखी वाचा : “मैं मर्द ही नहीं हूँ…”, ‘जयेशभाई जोरदार’चा जोरदार ट्रेलर पाहिलात का?

५. हे लोक प्रामाणिक आणि स्वभावाने भावनिक असतात. त्यामुळे हे लोक चांगले श्रोते असतात.

६. मूलांक २ असलेल्या लोकांसाठी राजकारण, वैद्यकीय, पर्यटन, संपादन, लेखन आणि डान्स इत्यादी क्षेत्रात काम करणे फायदेशीर ठरते.

आणखी वाचा : RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा घेतली, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

७. या लोकांचा स्वामी चंद्र ग्रह आहे. चंद्र हा सौंदर्याचा प्रतिक आहे असे मानले जाते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)