अंकशास्त्र म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील संख्यांचा अभ्यास. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संख्या खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही तर व्यक्तीला त्याच्या/तिच्या जीवनात आणि दिवसातील अनेक समस्यांपासून सुरक्षित राहण्याचा अंदाज आणि चेतावणी देते. अंकशास्त्र वाचनात बरीच सखोल गणना समाविष्ट असते. आज आपण जाणून घेऊया मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय आणि ते कसे शोधायचे.
मूलांक (जन्म क्रमांक) म्हणजे काय?
तुमचा मूलांक तुमची आणि तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. हा शब्द दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून बनला आहे; मूल म्हणजे मुख्य आणि अंक म्हणजे संख्या. मूलांकाचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आणि तो एखाद्याचा स्वभाव, गुण, गुणवत्ता इत्यादींबद्दल सांगतो.
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
मूलांकाची गणना कशी करावी?
मूलांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड आहे, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २५ ऑगस्ट २००१ रोजी झाला असेल, तर तुमची मूलांक २+५ = ७ आहे. जर तुमची जन्मतारीख २० नोव्हेंबर २००५ असेल, तर तुमची मूलांक २+० = २ आहे. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असेल.
भाग्यांक म्हणजे काय?
भाग्यांक हा आपल्या जन्मतारखेत लपलेला अंक आहे. भाग्य म्हणजे नशीब. भाग्यांक किंवा भाग्य क्रमांक जन्मतारखेच्या बेरीज प्रक्रियेद्वारे ठरवला जातो. भाग्यांक खूप महत्वाचा आहे आणि आपले भविष्य ठरवण्यास मदत करतो.
भाग्यांकाची गणना कशी करावी?
तुमचा भाग्यांक जाणून घेण्यासाठी, तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करा. म्हणजे २ ऑगस्ट १९९५, २+८+१+९+९+५= ३४ = ३+४ =७. तर, ७ हा या प्रकरणात भाग्यांक आहे.
तुमचा मूलांक आणि भाग्यांक जाणून घेतल्याने तुम्हाला जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये नक्कीच मदत होईल. एखादी व्यक्ती त्याचं भविष्य, करिअर आणि नोकरीशी संबंधित यश जाणून घेऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)