ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावाला एक राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक जन्मतारखेसाठी संख्या असते, ज्याला आपण मुलांक म्हणतो. अंकशास्त्रानुसार, तुमचा मुलांक काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडता आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ३,१२,२१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांची मुलांक संख्या ३ असते. जाणून घेऊया कोणासाठी मे महिना खूप शुभ असणार आहे.
मूलांक १
या महिन्यात नोकरी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मान्यता मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधीही मिळतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(हे ही वाचा: Astrology: मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात? जाणून घ्या त्यांच्या स्वभावाविषयी)
मूलांक २
या महिन्यात कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. या महिन्यात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. योजना वेळेवर पूर्ण होतील. या महिन्यात आर्थिक बाबतीत यश मिळेल, कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशीचे लोक मानले जातात स्वार्थी!)
मूलांक ६
या महिन्यात काम आणि व्यवसायात बदलाच्या संधी उपलब्ध होतील. वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. या महिन्यात काम आणि व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात काही बदल होऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जीवनशैलीतही बदल होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. या महिन्यात आरोग्य चांगले राहील.
(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी मानल्या जातात भाग्यवान!)
मूलांक ७
या महिन्यात नोकरी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. महिन्याच्या सुरुवातीला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. महिन्याच्या मध्यात महत्त्वाच्या लोकांशी तुमची भेट होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. या महिन्यात आरोग्य चांगले राहील. महिन्याच्या शेवटी कुटुंबात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)