Mulank 2 Personality: अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाचा आणि भविष्याचा अंदाज लावू शकतो. आज आपण अशा मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या खूप विश्वासू असतात आणि कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत. अशा महिला पैशाच्या बाबतीत थोड्या खर्चिक असतात पण त्या जीवनाचा खूप आनंद घेतात.

अंकशास्त्रानुसार, या मूलांक २ असलेल्या मुली अत्यंत निर्मळ मनाच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात. कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक २ असतो. असे मानले जाते की या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. त्यांना कल्पना, भावना आणि स्पष्ट मनाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या मूलांकाच्या मुलींमध्ये एक विशेष प्रकारची सर्जनशीलता, भावनिकता आणि कोमलता दिसून येते.

मनातील गोष्ट सहज मांडू शकत नाही

मूलांक २ असलेल्या मुली कल्पनाशील, भावनिक असतात पण थोड्या संकोची वृत्तीच्या असतात. त्या आपल्या भावना कोणालाही सहजपणे व्यक्त करू शकत नाहीत. पण जेव्हा त्या एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा त्या त्या व्यक्तीला आपल्या हृदयात जपून ठेवतात. अशा मुली बऱ्याचदा काही अडचणींनंतर लग्न करतात.

मनाने निर्मळ असतात


अंकशास्त्रानुसार, मूलांक २ असलेल्या मुली निर्मळ मनाच्या असतात. त्याच्यात मनात कोणताही कपट नसतो. त्याच्या या स्वभावामुळेच सर्व लोकांना त्या खूप आवडतात. त्या थोडी खर्चिक असतात आणि मित्रांबरोबर असताना पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही.

संवाद कौशल्य उत्कृष्ट

या वर्गातील मुलींचे संवाद कौशल्य उत्कृष्ट आहे. त्यांच्या संभाषणाचा सूर अत्यंत प्रभावी आहे. त्यांच्याकडे जवळजवळ प्रत्येक विषयाची माहिती असते. म्हणूनच ती कोणत्याही विषयावर बोलतात तेव्हा सर्वजण प्रभावित होतात. त्या आपले मत मांडतात पण कोणावरही लादत नाही.

मनापासून नाते जपतात


मूलांक २ असलेल्या मुली सरळ-साध्या स्वभावाच्या आणि दयाळू असतात. त्या नातेसंबंध टिकवण्यासाठी खूप संवेदनशील असतात. त्या बाहेरील लोकांशी पटकन जुळत नाहीत, परंतु जेव्हा त्या एकदा एखाद्याशी जोडल्या जातात तेव्हा त्या प्रामाणिक मनाने ते नाते टिकवण्याचा प्रयत्न करतात. अशा मुलींबरोबर लग्न करणे प्रत्येकाचे स्वप्न असते.