Numerology Predictions for 2025 Number 5: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेचा एकांक हा मूलांक असतो. म्हणजेच समजा जर एखादी व्यक्ती कोणत्याही महिन्यातील ९, १८, २७ या तारखेला जन्मली असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ९+ १ = ८, २ + ७ = ९ असतो. अशाप्रकारे १ ते ९ हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो, तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखात आम्ही ४ मूलांक असलेल्या व्यक्तींना येणारे नवे वर्ष कसे जाईल हे सांगितले होते. आज आम्ही मूलांक ५ ला २०२५ वर्ष कसे जाईल हे सांगणार आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५,१४,२३, तारखेला झाला असेल; अशा लोकांचा मूलांक ५ असतो. या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. या व्यक्तींच्या जीवनात सतत नवनवीन अनुभव येत असतात. नवीन प्रवास, नवीन मित्रमंडळी यांना लाभत असते.

मूलांक ५ ला कसे जाईल नवीन वर्ष?

यावर्षी २०२५ साली २+०+२+५= ९. या अंकावर मंगळ ग्रहाचा अंमल असणार आहे. तसे पाहता ९ आणि ५ एकमेकांचे शत्रू किंवा मित्रही नाहीत. ५ हा अंक तसा अजात शत्रूत असल्यामुळे उद्योगधंद्यात लोकांशी येणारा स्नेहसंबंध वाढत असतो. यावर्षी मूलांक ५ ला ९ ची साथ लाभणार असून ५ मूलांकाला आळस, रेंगाळणे, चालढकल करणे या गोष्टी करता येणार नाहीत. ९ अंकाची लष्करी शिस्त पाळावी लागेल. व्यवहार चातुर्य, स्पष्टता हे ९ कडून मिळणारे वरदान त्यांनी मनापासून स्वीकारावे, त्यात त्यांचा फायदा संभवतो.

हेही वाचा: Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

खनिज वस्तू, बँकिंग क्षेत्र, वकील, कोर्ट-कचेरी क्षेत्रात ५ मूलांकाच्या लोकांना यावर्षी उत्तम यश लाभेल. तसेच २०२५ मधील ५ अंकाचे अस्तित्वही खूपशा व्यावहारिक घटना, नवीन योजना, नवीन कल्पनांना उत्तेजन देणारे ठरेल. वर्षभरात काळा व निळा रंग टाळावा. हिरवा, पिवळा, सफेद रंगाचा आवर्जून उपयोग करावा. मे, ऑगस्ट, ऑक्टोबर हे महिने लाभदायक ठरतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology number 5 career job wealth predictions astrology predictions for number 5 numerology astrology predictions in marathi sap