Personality Traits : ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ६ असतो. मुल्यांक ६ वर शु्क्राचा प्रभाव पडतो. शुक्र ग्रह सौंदर्य, ऐश्वर्य, वैभव आणि उच्च जीवनशैली आणि सुंदरतेविषयी आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो.
मूलांक ६ असलेले लोक पैसा खूप खर्च करतात. या लोकांना श्रृंगार, महागडे कपडे आणि शूजवर खूप जास्त पैसा खर्च करायला आवडतो. अंकशास्त्रानुसार या लोकांमध्ये अनेक कमतरता आहे ज्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. आज आपण ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
या लोकांचा स्वभाव अस्थिर असतो. हे लोक जिथे जातात तिथे त्यांना आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायला आवडते. हे लोक जास्त वेळ एकाच जागी टिकत नाही. मूलांक ६ खूप फॅशनेबल असतात. त्यांना फॅशनची खूप जास्त आवड असते. हे लोक आकर्षित सु्द्धा दिसतात. नातेसंबंध ठेवताना किंवा व्यवसायात मूलांक ७ असलेल्या लोकांबरोबर यांचे चांगले पटते.
‘या’ गोष्टींमुळे करावा लागतो अडचणींचा सामना
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेले लोक म्हणजे ज्यांचा मूलांक ६ असतो त्यांना ऐशोआरामाचे जीवन जगायला आवडते. त्यांना त्यांच्या अवतीभोवती पैसा, सुख, संपत्ती, आजुबाजूला नोकर आणि आराम हवा असते. हे लोक त्यांचा भरपूर पैसा आणि वेळ यामध्ये घालवतात. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या या सवयी सोडायला पाहिजे.
या लोकांना उच्च जीवनशैली जगायला आवडते. ते कपडे, मेकअप, इत्यादी गोष्टींवर अधिक पैसा खर्च करतात. जर यांच्याकडे पैसे नसतील तर ते पैसे उसने घेतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात यामुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रत्येकवेळी लाइम लाइटमध्ये राहायला आवडते. हे लोक खोटी वरचढ दाखवण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. जे लोक यांचे कौतुक करतात, ते त्यांचे प्रिय लोक असतात, मग ते कौतुक खोटे का नसो. यामुळे त्यांच्या आयुष्यात खरी आणि प्रिय लोक कमी असतात.
जे लोक ६, १५, २४ तारखेला जन्मतात त्या लोकांच्या वाट्याला संघर्ष वारंवार येतो. जेव्हा त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणखी कमी होतो. हे संघर्षाचा सामना करण्यास घाबरतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)