Numerology for Best Wife : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये जसे व्यक्तिच्या कुंडलीमध्ये विराजमान ग्रहांनुसार माहिती सांगितली जाते. तसेच अंकशास्त्रामध्ये व्यक्तिच्या जन्मतारखेनुसार माहिती सांगितली जाते. आज आपण ६ या अंकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा थेट संबंध धन आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रहाशी असतो. कोणत्याही महिन्यात ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. ६ मुलांक असलेल्या महिला पती आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यवान मानल्या जातात. या पतीच्या प्रत्येक सुख दु:खात त्यांच्या बरोबर असतात.
फिरायला आवडते
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक ६ असतो त्या लोकांवर नेहमी शुक्र ग्रहाचा प्रभाव पडतो. या लोकांच्या व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. या लोकांना लक्झरी आयुष्य जगायला आवडते. या लोकांनाकुपैसे खर्च करायला आवडते. हे लोक अतिशय रोमँटिक सुद्धा असतात. तसेच हे लोक जोडीदाराची काळजी सुद्धा घेतात. हे लोक पैसा खर्च करताना कोणताही विचार करत नाही. त्यांना कंजूषपणा आवडत नाही. या लोकांना फिरायला खूप आवडते.
नवऱ्याच्या प्रत्येक सुख दु:खात असते कायम बरोबर
मूलांक ६ असलेल्या मुलींचा स्वभाव थोडा भावुक असतो. या मुलींना कोणत्याही गोष्टीचे खूप लवकर वाईट वाटते. या मुली लग्नानंतर प्रोफेशनल जीवन चांगल्याने मॅनेज करून होतात. यांना करिअरमध्ये पुढे जाण्यास यांच्या सासरचे लोक सहकार्य करतात. या मुली त्यांच्या नवऱ्याच्या प्रत्येक सुख दु:खात त्यांच्या बरोबर असतात.
या मुली लग्नानंतर सासरच्या सर्व लोकांना घेऊन चालतात. पती आणि सासरच्या लोकांसाठी या नशीबवान ठरतात. या अतिशय दयाळू आणि शांती प्रिय असतात. या मुली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने कोणालाही आकर्षित करू शकतात. या लोकांमध्ये दया प्रेम भरपूर असते. तसेच या घर कुटुंबाती सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)