ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार, ५ अंक हा तुमच्यासाठी शुभ मानला जातो. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना धनलाभ होतो अशी मान्यता आहे.
५ अंक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की, या अंकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती सर्वांसोबत पटकन मिसळतात. इतकंच नाही तर त्या आपल्या वागण्याने, चांगलं चारित्र्य आणि प्रामाणिकपणाने समोरच्या व्यक्तीच्या हृदयात स्थान निर्माण करतात. त्यांच्याकडे वाया घालवण्यासाठी वेळ नसतो किंवा त्या आयुष्यातील कोणताही क्षण व्यर्थ घालवत नाहीत. ते लोक जीवन योग्यरीत्या जगण्यावर विश्वास ठेवतात, तसेच आपले ध्येय यशस्वीरीत्या साध्य करतात. जाणून घेऊ ५ अंकाशी संबंधित आणखी काही गोष्टी.
१२ वर्षांनी विपरीत राजयोग बनल्याने ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन? ‘या’ चुका टाळून होऊ शकता करोडपती
असं म्हणतात की, प्रवास करणे हा त्यांचा छंद असतो, पण बिझी शेड्यूलमुळे त्यांना प्रवास करणे अनेकदा शक्य होत नाही. ते जितके जास्त प्रवास करतात, तितका फायदा त्यांना निश्चित होतो. मुळात अशा व्यक्ती मनाने आणि बुद्धीने संपन्न असतात. कोणत्याही कामाचे निर्णय ते लगेच घेतात.
याशिवाय हे लोक शारीरिकदृष्ट्या कठोर परिश्रम करण्यात थोडे मागे असतात परंतु ते बौद्धिक काम अधिक करू शकतात. ते कामात थकत नाहीत. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेतात, त्यांच्यात वातावरणानुसार स्वत:ला घडवण्याची अद्भुत क्षमता आहे, म्हणूनच समाजात त्यांचा सर्व आदर करतात, त्यांचे नाव सर्वांमध्ये लोकप्रिय असते. त्यांचा गरजेपेक्षा खर्च जास्त असा स्वभाव आहे अशीही मान्यता असते.
जीवनात ते स्वत:ला केवळ एका कामात किंवा व्यवसायात समाधानी नसतात. त्यांच्यासाठी जीवनात एकापेक्षा जास्त कार्ये, एकापेक्षा जास्त स्रोत आणि एकापेक्षा जास्त योजना असणे गरजेचे असते. अशा लोकांना अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. अशा लोकांनी लॉटरी वगैरेमध्ये नशीब आजमावले तर त्यांना लाभ मिळू शकतो.
अशा व्यक्तींकडे फावला वेळ खूप कमी असतो. पण व्यवसाय आणि नोकरी तसेच साईड बिझनेसकडे लक्ष दिले तर त्यात भरपूर यश मिळते. पण या व्यक्ती एकच काम जास्त काळ करू शकत नाहीत. त्यामुळे त्या सतत आपली नोकरी बदलत असतात. जीवनात त्या स्थिरता नसतात. त्यांना त्यांचा कार्यक्रम वारंवार बदलावा लागतो, कारण कोणतेही काम ते पूर्णत: करू शकत नाहीत.
या व्यक्तींच्या आयुष्यात कोणी ना कोणी एक साहाय्यक असतो. जर त्यांचा कोणी साहाय्यक किंवा मित्र त्यांच्यापासून दूर गेला, तर त्याच वेळी त्यांना दुसरा साहाय्यक किंवा मित्र मिळतो. अशा प्रकारे त्यांच्या जीवनात मित्र आणि साहाय्यकांची कमतरता नसते. अगदी कठीण कामही ते सहज शिकतात आणि काही काळानंतर त्यात निपुण होतात. त्यांच्या कामात अनेक वेळा अडथळे आणि अडचणी येतात, पण ते सहजासहजी हिंमत हरत नाहीत आणि काम करत राहतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)