Numerology Secrets : अंकशास्त्रानुसार मुलांकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असं म्हणतात, मूलांकवरून कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि भविष्याविषयी माहिती मिळते. मूलांकवरून हे कळते की येणारा काळ त्या व्यक्तीसाठी कसा असणार आहे. भविष्यात हे लोक कितपत यशस्वी होतील, याचा अंदाज लावला जातो. जाणून घेऊ या मूलांक ७ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य कसे असणार? (Numerology people born on these dates get government job they will get money wealth and happiness in life)
मूलांक ७ असलेले कोण असतात?
अंकशास्त्रामध्ये मूलांक ७ हा केतुचा आकडा असतो. जे लोक कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मतात त्यांचा मूलांक ७ असतो. जन्म तारखेच्या दोन्ही संख्यांना जोडून मूलांक चा आकडा कळतो. जसे की तुमची जन्मतारीख १६ असेल तर १+६ म्हणजे ७. तुमचा मूलांक ७ आहे. आज आपण मूलांक ७ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.
अभ्यासात असतात अतिशय हुशार
मूलांक ७ असलेले लोक अभ्यासात खूप हुशार असतात. त्यांचे अभ्यासात मन लागते. ते भरपूर अभ्यास करतात.
ते नेहमी ध्येयप्रेमी असतात आणि अभ्यासात चांगल्या अंकानी पास होतात. ते त्यांच्या वर्गात अव्वल येतात. प्रत्येक विषयात त्यांना चांगले अंक मिळतात. विद्यार्थी जीवनात त्यांना भरपूर यश मिळले.
यांच्या नशीबात असते सरकारी नोकरी
मूलांक ७ असलेल्या लोकांच्या नशीबात सरकारी नोकरी असते. ते अभ्यासात अव्वल असतात तसेच करिअरमध्ये हे लोक खूप यशस्वी होतात. त्यांना सरकारी नोकी मिळण्याचे योग जुळून येतो. ते सरकारी नोकरीमध्ये खूप यश मिळवतात. ते मोठ्या पदापर्यंत पोहचतात. त्यांना आयुष्यात त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते.
मूलांक असणाऱ्या ७ लोकांचे व्यक्तिमत्त्व
मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा स्वभाव कोमळ असतो. ते अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असतात. या लोकांना खूप कमी वेळा राग येतो. हे लोक सर्वांबरोबर प्रेमाने बोलतात. गोड बोलीचा वापर करतात. यामुळे आयुष्यात ते खूप पुढे जातात. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे खूप लोकप्रिय असतात. त्यांना इतरांना मदत करायला खूप आवडते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)