Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची जन्मतारीख एकत्र करून ‘हा’ मूलांक तयार होतो, अशा लोकांना भाग्यवान समजले जाते. या लोकांना आयुष्यात जास्त टेन्शन घेण्याची गरज नसते, असेही म्हणतात. कारण त्यांचे जीवन कष्ट न करता सामान्य मार्गाने चालते. महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. जाणून घ्या हा मूलांक असलेल्या लोकांबद्दल रंजक माहिती…
मूलांक ९ चा शासक ग्रह मंगळ आहे. हे लोक स्वभावाने धैर्यवान असतात आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. त्यांचे जीवन बहुतेक संघर्षमय असते. अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात असंतोषाची भावनाही निर्माण होते. जीवनाला शिस्त लावून ते यशस्वी होऊ शकतात. त्यांचे रोज ध्यान केले पाहिजे.त्यांना कला आणि गूढ शास्त्रांमध्ये चांगली रुची असते. जर या लोकांनी एखाद्या कामात आपले १०० टक्के दिले तर त्यांना उच्च दर्जा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या लोकांमध्ये माणुसकी असते आणि त्यांच्यात सहिष्णुता, उदारताही असते.
(हे ही वाचा: १४१ दिवस शनी सुरू करेल उलटी चाल; ‘या’ ४ राशींच्या लोकांना होऊ शकतो आर्थिक)
हे लोक जास्त पैसे खर्च करत नाहीत. त्यांची आर्थिक स्थिती आयुष्यात सामान्य राहते. हे लोक धर्मादाय इत्यादींमध्ये खूप पैसा खर्च करतात. त्यांच्याकडे कलात्मकता आणि नाट्य प्रतिभा, तसेच लेखन प्रतिभा असते. या मूलांकाचे लोक खूप आक्रमक आणि तापट असतात.
(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी मानल्या जातात भाग्यवान!)
या मूलांकाच्या लोकांमध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याची क्षमता आणि विशेषता असते. जन्मतःच त्यांचा देवाकडे कल असतो. हे लोक निःस्वार्थपणे लोकांची सेवा करतात आणि क्षमाशील असतात. या राशीचे लोक जास्त काळ कोणतीही गोष्ट मनामध्ये ठेवत नाहीत. त्यांच्यातील सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते त्यांच्या दु:खाचा जास्त काळ विचार करत नाहीत.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)