अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे भविष्य सांगितले जाते. यासाठी ज्योतिषशास्त्रातील १२ राशींप्रमाणेच अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत आणि या सर्व मूलांकांवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज. असे मानले जाते की काही मूलांक व्यक्तीसाठी खूपच भाग्यवान ठरतात. यामुळे त्यांना जीवनात यश संपादन करण्यास मदत होते. आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर पडणाऱ्या प्रभावाबद्दल जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रात मूलांक ७ किंवा ७ हा अंक अतिशय शुभ मानला जातो. हा मूलांक असलेल्या व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला होतो, त्यांची मूलांक संख्या ७ असते. त्यांना संपत्तीची देवता कुबेराचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना त्यांच्या जीवनात अपार संपत्ती आणि यश मिळते, असे मानले जाते.
- खूपच नशीबवान असतात
मूलांक ७ असलेले लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते. त्यांचे सर्व काम अगदी सहजतेने होते. कोणत्याही कामासाठी त्यांना फार कष्ट करावे लागत नाहीत. तथापि, ते मेहनती आणि हुशार असतात आणि ते त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच स्वस्थ बसतात. या लोकांना मोकळेपणाने जीवन जगणे आवडते. ते कधीही कोणाच्या दबावाखाली जगत नाही.
- कुटुंबाचेही नशीब चमकते
मूलांक ७ असलेल्या व्यक्ती केवळ स्वतःच भाग्यवान नसतात, तर ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही भाग्यवान ठरतात. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलते आणि घरात अपार सुख-समृद्धी येते. मूलांक ७ असणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून खूप प्रेम मिळते. त्यांचे मन स्वच्छ आणि स्वभाव चांगला असल्यामुळे ते लोकांना सहज आवडतात. त्याचबरोबर समाजात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते.
- दृढ निश्चयी
मूलांक ७ असलेल्या व्यक्ती दृढ निश्चयी असतात. या लोकांमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामे करण्याची क्षमता असते. जर या लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर ते खूप यशस्वी होतात. तसेच, नोकरीतही ते उच्च पदावर पोहोचतात. राजकारणही त्यांच्यासाठी चांगलं क्षेत्र ठरतं.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)