Numerology mulank 5,8 and 9 Predictions : अंकशास्त्रामध्ये मूलांकला विशेष महत्त्व आहे. या मूलांकच्या आधारावर व्यक्तीचे भविष्य, व्यक्तिमत्व, वागणूक इत्यादी विषयी माहिती जाणून घेता येते. आज आपण त्या मूलांकच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत जे खूप कंजूष असतात आणि हे लोक पैसे खर्च करायला कचरतात.

मूलांक – अंकशास्त्रात, मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मिळणारा एक ते नऊ मधील अंक. उदा.
जर तुमची जन्मतारीख २३ असेल, तर २ + ३ = ५, तुमचा मूलांक ५ होईल.
जर तुमची जन्मतारीख २९ असेल तर २ + ९ = ११, आणि ११ म्हणजे १ + १ = २, म्हणून तुमचा मूलांक २ होईल.

मूलांक ५

ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ असेल त्यांचा मूलांक ५ होईल. मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह बुद्धी, वाणी, चातुर्य, व्यवसाय आणि गणिताचा कारक असतो. मूलांक ५ चे लोक बुद्धीने खूप तेज असतात. या लोकांना गुंतवणूक करायला खूप आवडते. पण हे लोक खूप कंजूष असतात. या लोकांना पैसे खर्च करणे आवडत नाही. या लोकांना पैसे वाचवून गुंतवणूक करायला आवडते. पण या लोकांना इतरांचे पैसे खर्च करायला आवडते.

मूलांक ८

ज्या लोकांची जन्मतारीख ८, १७ आणि २६ आहे, त्यांचा मूलांक ८ असतो. शनिच्या प्रभावामुळे या लोकांना आयुष्यात संघर्ष आणि मेहनतीनंतर यश प्राप्त होते. हे लोक पैशांची किंमत समजतात त्यामुळे खूप विचार करून पैसा खर्च करतात. हे लोक दिखावा करत नाही आणि पैशांची उधळपट्टी करणे, या लोकाना अजिबात आवडत नाही. त्यामुळे हे लोक आयुष्यात खूप श्रीमंत होतात.

मूलांक ९

ज्या लोकांची जन्मतारीख ९,१८ आणि २७ तारखेला असते, त्यांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ चे स्वामी मंगळ ग्रह आहे. हे लोक खूप धाडसी स्वभावाचे आणि पराक्रमी असतात. हे लोक दिखावा अजिबात करत नाही आणि आयुष्यात रिस्क घ्यायला या लोकांना अजिबात आवडत नाही. हे लोक जिथे गरज आहे, तिथे पैसा खर्च करतात. उधळपट्टी करायला या लोकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे यांना लोक कंजूष म्हणतात. मूलांक ९ असलेल्या लोकांना गुंतवणूक करायला आवडते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)