Numerology : अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मुलांकचे विशेष महत्त्व आहे. आज आपण मूलांक ९ विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. या मूलांकचे लोक इतरांना प्रेरणा देतात. हे लोक अतिशय उत्साही आणि धाडसी असतात. आज आपण या लोकांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

चांगले बिझनेसमॅन

मूलांक ९ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ असतो. मंगळ हा उत्साह आणि ऊर्जेचा कारक असतो. मूलांक ९ असलेले लोक स्वभावाने खूप उत्साही असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात तयार राहतात. तसेच हे लोक शिस्तप्रिय असतात आणि त्यांच्या तत्वांवर ठाम असतात. याच कारणामुळे असे लोक खूप चांगले व्यावसायिक होतात आणि आयुष्यात खूप प्रगती करतात.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
people born on these date can become a good leader
‘या’ तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते, राजकारणात कमवतात नाव

हेही वाचा : आज अंगारकी संकष्टी चतुर्थीला निर्माण झाले त्रिग्रही, लक्ष्मी-नारायण अन् सुनाफा योग, ५ भाग्याशाली राशींचे नशीब फळफळणार

पैसा कमावण्यामध्ये अत्यंत हुशार असतात

या लोकांजवळ पैशांची कमतरता कधीही भासत नाही. हे लोक धाडसी, मेहनती आणि व्यावहारीक असतात. हे लोक पैसा कमावण्यामध्ये अत्यंत हुशार असतात. हे लोक ज्या व्यवसायात असतात त्यामध्ये यशस्वी होतात. हे लोक पैसा कमवण्यासाठी खास योजना बनवतात आणि त्यानुसार मेहनत घेतात. त्यामुळे त्यांना यश नक्की मिळते.

कलाप्रेमी असतात

मूलांक ९ असलेले लोक कलाप्रेमी असतात. त्यांना कला क्षेत्रात आवड असते. हे लोक शिक्षणामध्ये अव्वल असतात. या लोकांकडे कोणताही विषय आत्मसात करण्याची शक्ती असते. याच कारणामुळे हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करू शकते. कला आणि विज्ञानमध्ये यांना विशेष आवड असते. कला क्षेत्रात ते चांगले करिअर करू शकतात.

हेही वाचा : संकष्टी चतुर्थी, २५ जून पंचांग: २०२४ च्या एकमेव अंगारकीला मोदक पेढे वाटण्याचा योग आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीत?

रागीट स्वभावाचे असतात

मूलांक ९ असलेले लोक खूप रागीट स्वभावाचे असतात. त्यांचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि रागाच्या भरात ते वाट्टेल ते करतात. रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाही. जोडीदाराबरोबर यांचे मतभेद होत असतात. या लोकांना सुंदर आणि आज्ञाकारी जोडीदार हवा असतो याच कारणामुळे वैवाहिक जीवनात यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे, अतिशय गरजेचे आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)