Numerology Mulank 5 : अंकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे जे संख्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात व्यक्तित्व आणि भविष्याविषयी माहिती देते. असं म्हणतात प्रत्येक अंकांमध्ये एक विशेष ऊर्जा आणि गुण असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या नशीबाविषयी जाणून घेता येते. विशेषत: व्यक्तीच्या जन्मतारखेवरून व्यक्तीच्या भविष्याविषयी आणि स्वभावाविषयी जाणून घेता येते.
कोणत्याही व्यक्तीच्या मूलांकला पाहून त्या व्यक्तीविषयी जाणून घेता येते. अंक शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांक कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जुळलेला असतो आणि तोच ग्रह त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि जीवनाविषयी दिशा ठरवतो. आज आपण अशाच एका खास मूलांकविषयी जाणून घेणार आहोत, जो यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देतो. या मूलांकचे लोक पैसे कमावण्यात आणि संघर्ष करण्यात पुढे असतात.
मूलांक ५
एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला होत असेल तर त्याचा मूलांक ५ असतो. या मूलांकचा स्वामी ग्रह बुध असतो, ज्याला बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे प्रतीक मानले जाते जाणून घेऊ या मूलांक ५ असलेल्या लोकांची खासियत काय आहे?
रिस्क घेण्यास घाबरत नाही
मूलांक ५ असणारे लोक कोणताही निर्णय घेताना खूप जास्त वेळ विचार करत नाही. हे लोक निर्णय घेण्यासाठी खूप सक्षम असतात आणि धोका पत्करण्यासाठी सु्द्धा मागे पुढे पाहत नाही. मूलांक ५ असलेले लोक कोणताही निर्णय घेताना जास्त वेळ विचार करत नाही. त्यांचा धाडसी स्वभाव त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतो.
बुद्धिमान लोक
या लोकांची बुद्धी अत्यंत तेज आहे. गे लोक प्रत्येक कामात समजूतदारपणा आणि रणनीति करतात ज्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या खूप मजबूत असतात. ते बुद्धीचा वापर करून आयुष्यात खूप पैसा कमावतात. यांना सहसा भविष्यात पैशांची कमतरता भासत नाही. हे लोक नोकरी करो किंवा व्यवसाय, ते पूर्ण मेहनतीने आपले का करतात.
प्रवास करायला आवडते.
या लोकांना फिरायला खूप आवडते. हे दीर्घ काळासाठी एका ठिकाणी टिकू शकत नाही. फिरायला जाणे, हे मूलांक ५ असणाऱ्या लोकांची खासियत असते. त्यांचे संवाद कौशल्य त्यांना अधिक लोकप्रिय बनवतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)