Numerology : अंक शास्त्रामध्ये १ ते ९ अकांना विशेष महत्त्व आहे. या अंकाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तिथीनुसार व्यक्तीचा मूलांक ठरवला जातो. मूलांकनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, आणि भविष्याविषयी माहिती मिळते. आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. मूलांक ६ चा स्वामी धन आणि वैभवचे स्वामी शुक्र देव आहे.
कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या मूलांकचे लोक अतिशय आकर्षक दिसतात. तसेच शुक्र ग्रहाच्या कृपेने हे लोक अपार धनाचे स्वामी असतात. तसेच हे लोक अतिशय प्रामाणिक आणि काळजी घेणारे जोडीदार सुद्धा असतात. जाणून घेऊ या, या मूलांक विषयी सविस्तर. (Numerology people on these dates have so much money they will get wealth by the grace of Shukra)
लक्झरी आयुष्य जगतात
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धन, वैभव, सुंदरतेचे कारक मानले जाते. त्यामुळे या मूलांकशी संबंधित लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. तसेच हे लोक अतिशय लक्झरी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. हे लोक स्वत:ला नेहमी तरुण समजतात. या लोकांना कलेची जाण असते आणि हे नेहमी कला प्रेमी असतात. पहिल्या भेटीत हे लोक कोणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात. हे लोक व्यवहारी असतात.
आर्थिक स्थिती असते उत्तम
ज्या लोकांचा मूलांक ६ असतो त्या लोकांना लक्झरी गोष्टी खरेदी करण्याची आवड असतेच तसेच हे लोक वेळोवेळी देश विदेशात फिरायला जातात. तसेच या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहते. या लोकांना वेगवेगळे ड्रेस परिधान करण्याची आवड असते. हे लोक थोडे मिश्किल स्वभावाचे असतात. हे लोक भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतात. तसेच हे लोक कोणत्याही परिस्थिती आनंदी राहतात.
या क्षेत्रात घडवतात करिअर
अंक शास्त्रानुसार, मूलांक ६ शी संबंधिक लोक चित्रपट क्षेत्रात, मिडिया क्षेत्रात, मॉडलिंग क्षेत्रात, नाटक आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर घडवतात आणि यांना चांगले यश मिळते. या मूलांकचे लोक कपडे, लक्झरी वस्तू, हिरा, सोने चांदीशी संबंधित व्यवसाय करतात. या व्यवसायातून यांना चांगला लाभ मिळतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)