Birth dates are passionate : अंकशास्त्रामध्ये अंकाना विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात १ ते ९ अंकाचे वर्णन मिळते. या १ ते ९ अंकांना मूलांक म्हणतात. या मूलांकवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे वर्चस्व असते. आज आपण मूलांक ८ विषयी जाणून घेणार आहोत ज्याचा थेट संबंध शनि देवाशी होतो. ज्यो लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ८ असतो. असे लोक खूप मेहनती आमि कर्मठ स्वभावाचे असतात.
हे लोक कामाविषयी खूप महत्वाकांक्षी व जिद्दी असतात. हे लोक प्रत्येक गोष्टीत पहिल्या नंबरवर येण्याचा प्रयत्न करतात. तसेच या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते. मूलांक८ असलेले लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.
कामाविषयी असतात खूप जिद्दी
ज्या लोकांचा मूलांक ८ असतो, ते लोक कामाविषयी खूप जिद्दी असतात. ते लोक त्यांचे काम वेळेत पूर्ण करतात. या लोकांना कामात निष्काळजीपणा आवडत नाही. हे लोक मेहनती आणि न्याय प्रिय असतात.
हे लोक खूप मॅनेज करतात या लोकांना पसरलेल्या वस्तू अजिबात आवडत नाही. हे लोक भौतिक आणि अध्यात्मिकतेमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते. हे लोक कोणाच्याही दबावात येऊन काम करत नाही.
हे लोक योजना बनवण्यात असतात हुशार
मूलांक ८ शी संबंधित लोक दूरदर्शी विचारांचे असतात. तसेच हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत बनतात. हे लोक योजना बनवून कार्य करतात. तसेच धन संपत्तीची सेव्हिंग करण्यात हुशार असतात. हे लोक चांगली प्लानिंग करतात. तसेच या लोकांना कोणाची खुशामत करायला आवडत नाही आणि हे लोक कोणालाही स्वत:ची खुशामत करायला सांगत नाही.
हे लोक आपल्या शक्तीचा खूप कमी उपयोग करतात. तसेच आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. हे लोक नेहमी खरं बोलतात आणि मुद्दाम कोणालाही दुखावत नाही. मूलांक ८ असलेले लोक इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, तेल, पेट्रोल पंप, रिअल इस्टेट, कंस्ट्रक्शन आणि लोह्याशीसंबंधित व्यवसायात चांगले नाव कमावतात.