Numerology Secrets : अंकशास्त्रामध्ये जन्मतारीख आणि मूलांकला विशेष महत्त्व आहे. मूलांकवरून लोकांचे व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घेता येते. अंकशास्त्रानुसार १ पासून ९ पर्यंत मूलांक असतात. जन्मतारखेनुसार प्रत्येकाचा मूलांक हा वेगवेगळा असतो. आज आपण मूलांक १ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. (Numerology Secrets: Successful Businessmen Born on These Dates)
मूलांक १ असलेल्या लोकांची जन्म तारीख
जे लोक महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मतात, त्यांचा मूलांक १ असतो. मूलांक १ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य असतो. या लोकांना जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते. ते नेहमी सूर्यासारखे चमकतात.
हेही वाचा : दिवाळीनंतर ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार धनसंपत्तीचे सुख
मूलांक १ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व
मूलांक १ असलेले लोक अत्यंत प्रामाणिक असतात. हे कोणालाही फसवत नाही आणि कोणी त्यांना फसवले तर ते त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. ते नेहमी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून इतरांना प्रभावित करतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. काही प्रसंगी हे लोक राग व्यक्त करतात पण त्यांना नेहमी इतरांची काळजी असते. विशेषत: हे लोक त्यांच्या आई वडीलांची खूप काळजी घेतात. ते त्यांचा कमकुवतपणा नेहमी दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात..
मूलांक १ असलेल्या लोकांचे भविष्य कसे असते?
मूलांक १ असलेल्या लोक भविष्यात चांगली प्रगती करतात. हे लोक यशस्वी बिझनेसमॅन होतात. मूलांक १ असलेले लोक हिशोबात अव्वल असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती नेहमी उत्तम असते. या लोकांवर कधीही आर्थिक संकट येत नाही. त्यांच्याकडे नेहमी पर्यायी प्लॅन तयार असतो त्यामुळे कोणतेही संकट आले तरी ते घाबरत नाही. प्रत्येक संकटाचा ते हिंमतीने सामना करतात.
मैत्री मनापासून निभावतात
मूलांक १ असलेले लोक मैत्री मनापासून निभावतात. ते मित्रांना अडचणीच्या वेळी एकटे सोडत नाही. मित्रांच्या समस्या सोडविण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. यांची खासियत म्हणजे ते मूलांक १ असलेले लोक कधीही शब्द मोडत नाही. ते त्यांच्या शब्दावर ठाम असतात. त्यामुळे मित्रांचे हे लोक नेहमी प्रिय असतात
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)